Solapur : सोलापूर ड्रनेज दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, गुदमरून 4 जणांचा मृत्यू
ड्रेनेज लाईनचे काम करत असताना झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. एकूण 6 लोक या ड्रेनेजमध्ये पडले होते, त्यातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सोलापूर : ड्रेनेज लाईनचे काम करत असताना झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. एकूण 6 लोक या ड्रेनेजमध्ये पडले होते, त्यातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात सध्या शोकाकूल वातावरण आहे. सुरूवातील आधी एक मजूर ड्रेनेजमध्ये गेला होता, त्याचा शोध घेण्यासाठी इतर पाच मजूर गेले होते, मात्र त्यांच्यावरही काळाने घाला घातला. त्यांनाही बाहेर येता आले नाही.
मृत सर्व मजून परराज्यातले
राज्यात अनेक ठिकाणाहून लोक पोट भरण्यासाठी येतात, अनेकजण मिळेल ते काम करातात. अनेकजण मजुरी करतात, मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे जावावर बेतू शकते हे सोलापूरच्या घटनेने दिसून आले आहे. सुरूवातील एक मजूर ड्रेनेज दुरुस्तीसाठी मॅनहोलमध्ये गेला होता. तो मजूर बाहेर आला नाही म्हणून एका मागे एक असे 5 जण गेले, मात्र तेही बाहेर आले नाहीत, या दुर्घटनेतील सर्वजण हे परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे, एकूण चार मृतदेह हाती लागले आहेत तर दोन जण जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सोलापूर- अक्कलकोट रोडवरील दुर्घटना
ही दुर्घटना सोलापूर-अक्कलकोट रोडवर घडली आहे. या ड्रेनजच्या बाजूलाच रस्त्याचेही काम सुरू आहे. याच ठिकाणी ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी हे मजूर आता गेले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या मजुरांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असा जीवघेण्या ड्रनेजमध्ये उतरण्याआधी मजुरांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.