AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand padlkar : शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला, पडळकरांचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांचा मुखडा चंद्राचा आहे? सदाभाऊंचा सवाल

आमच्या हातात सत्ता दिली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले, आता कोणाचा सातबारा कोरा झाला सांगा? असा सवाल यावेळी गोपीचंद पडळकरांनी केला.

Gopichand padlkar : शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला, पडळकरांचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांचा मुखडा चंद्राचा आहे? सदाभाऊंचा सवाल
शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला, पडळकरांचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांचा मुखडा चंद्राचा आहे? सदाभाऊंचा सवाल
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 9:59 PM

सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी काढलेल्या जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा या यात्रेची आज सोलापुरात सांगता झाली. या सभेत सादाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) या जोडगोळीने सरकारविरोधात जोरदार फटकेबाजी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्रजींना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) करण्यासाठी 105 आमदार दिले. मात्र सनेने मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून बारामतीच्या नेतृत्वाखाली मविआ सरकार स्थापन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदी बसवल्यावल्याचा अनेकांना आनंद झाला, पण भ्रष्टाचार वाढला. आमच्या हातात सत्ता दिली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले, आता कोणाचा सातबारा कोरा झाला सांगा? असा सवाल यावेळी गोपीचंद पडळकरांनी केला.

शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर

तसेच महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला. त्यामुळे फडणवीस साहेब कुप्रवृत्तीला नांगरतील त्यासाठी त्यांना प्रतिकात्मक नांगर भेट दिला. शेतकऱ्यांचे वीज कट करत आहेत. मविआ म्हणतंय की भाजप सरकारने बिल थकीत ठेवले म्हणून आता महावितरण तोट्यात आली. पण मी कागद आणलाय की राज्यातील 3 कंपन्यांनी भाजप सरकारच्या काळात एक रुपया वसूल केले नाही तरीही कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या. मग आता कंपन्या तोट्यात कशा जातात? कारण मविआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार सुरुय म्हणूv कंपन्या तोट्यात गेल्या. जर उजनीच्या बाजूला असलेल्या तुळशी गावात पाणी देत नाहीत, पण उजनीतून पाणी पळविण्याचे काम मविआ सरकार करतंय, असेही ते म्हणाले.

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, मुंबईच्या सभेत मुख्यमंत्री मुंबईत पहिल्यांदा मास्क काढणार म्हणून बातम्या आल्या. अरे काय चंद्राचा मुखडा आहे काय? काही बोललं की शिवसेना नेते नेहमी म्हणतात 13 कोटी जनतेचा अपमान झाला. अरे हे काय तुमचे प्रॉडक्ट आहे का ? सगळ्यांचा अपमान व्हायला. भाजपचे कोणीही आत गेले की गुन्हा एका ठिकाणी घडतो आणि गुन्हे 12 ठिकाणी दाखल होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांना वेठबिगाऱ्यासारखे वापरु नका, असे म्हणत त्यांनी होय देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असेही ठणकावून सांगतले. तुम्ही पुन्हा आलात की हे गडी पहिल्या डब्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा आलात की ह्यांना सुट्टी देऊ नका, असेही त्यांनी फडणवीसांना सांगितले.

हे सुद्धा वाचा

अलिबाबा चाळीस चोरांची टोळी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हाल आहेत. 20 टन ऊस गेला की 2 टन काटा मारतात. उजनीचे पाणी बारामतीला निघालंय. मला बारामतीचा अंदाज येत नाही कारण आख्खी नीरा नदीला बारामतीला नेली आता उजनीचे पाणी नेत आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत आहे त्यामुळे आम्हाला साथ द्या. पालकमंत्री यांना सांगतो तुम्ही कंस मामा बनू नका. तुम्ही कंस मामा बनलात तर ही जनता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने कृष्ण होऊन तुमचा नाश करेल, असा इशाराही खोत यांनी यावेळी दत्ता भरणे यांना दिला. तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांकडे बघत नाही.ही आलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावी ही जनतेची इच्छा आहे, असेही खोत म्हणाले.

अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.