Pandharpur Crime : काळ आला होता पण…पाण्याऐवजी लायझोलचे पाणी प्यायली नववधू आणि…

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. अशाच एका कापड दुकानात लग्नाचा बस्ता खरेदीसाठी आलेल्या नववधूवरील संकट थोडक्यात निभावले आहे. पंढरपूर शहरातील आविष्कार या कपड दुकानात गोपाळपूर मधील एक कुटुंब नववधुसह लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते.

Pandharpur Crime : काळ आला होता पण...पाण्याऐवजी लायझोलचे पाणी प्यायली नववधू आणि...
चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 5:39 PM

पंढरपूर : लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पंढरपुरातील एका कापड दुकानात गेलेल्या तरुणी (Young Girl)ने तहान लागल्यावर चुकून फरशी पुसण्याचे लायझोल (Lyzol) टाकलेले केमिकल युक्त पाणी प्यायल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. हे पाणी प्यायल्यानंतर नववधूच्या घशात जळजळ व्हायला लागली. दुकानदाराच्या वेळीच ही भूलचूक लक्षात आली आणि मोठा अनर्थ टळला. सदर नववधू तरुणीवर पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. सदर घटनेबाबत पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

दुकानातील कामगाराने नजरचुकीने पाण्याऐवजी लायझोल मिश्रित पाणी दिले

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. अशाच एका कापड दुकानात लग्नाचा बस्ता खरेदीसाठी आलेल्या नववधूवरील संकट थोडक्यात निभावले आहे. पंढरपूर शहरातील आविष्कार या कपड दुकानात गोपाळपूर मधील एक कुटुंब नववधुसह लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरू असताना नववधू तरुणीला तहान लागली. त्यावेळी तिने तेथील कामगारांकडे पाणी मागितले. पण तिथे पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी लायझोल केमिकल ठेवले होते. तीच बाटली नजरचुकीने तरुणीला पाणी म्हणून दिली. त्या बाटलीतील पाणी पिताच तरुणीला घशात जळजळ होऊ लागली. यानंतर तिला पाणी समजून लायझोलचे पाणी प्यायला दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. यांनतर तातडीने सदर तरुणीला येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.