PM Narendra Modi | समोर विशाल जनसमुदाय, मोदींच्या डोळ्यात अश्रू, कंठ दाटला, सोलापुरात नेमकं काय घडलं?
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात सोलापुरात आले होते. यावेळी विशाल जनसमुदायासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. नेमकं काय घडलं?
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात सोलापुरच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांच्याहस्ते काही प्रकल्पाच भूमिपूजन झालं. काही प्रोजेक्टसच उद्गटन झालं. या दरम्यान पंतप्रधान मोदी भावूक झाल्याच पहायला मिळालं. पीएम आवास योजनेतंर्गत आज सर्वात मोठ्या सोसायटीच लोकार्पण झालं. ‘जर मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर…’ हे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही सेकंद ते थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यावेळी मोदी म्हणाले की, “आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. हजारो कुटुंबचा स्वप्न साकार होतय”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा उल्लेख केला. “आपल्या सर्वांसाठी ही भक्तीरसाने भरलेली वेळ आहे. 22 जानेवारीला तो ऐतिहासिक क्षण येणार आहे, ज्यावेळी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. अनेक दशकापासूनचा आराध्यच तंबूत दर्शन घेताना होणारा त्रास दूर होणार आहे. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेआधी काही संतांच्या मार्गदर्शनानुसार मी काही गोष्टींच पालन करतोय. हा योगायोग आहे, माझ्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिक पंचवटीमधून झाली” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महाराष्ट्र में पीएम आवास योजना के अंतर्गत गरीबों के लिए बनी सबसे बड़ी सोसायटी के लोकार्पण की बात करते हुए अपने बचपन को याद कर भावुक हुए प्रधान सेवक श्री @narendramodi। pic.twitter.com/oo9Khn22Hy
— BJP (@BJP4India) January 19, 2024
‘हे रामराज्यच आहे’
“श्रीरामच्या आदर्शावर चालून देशात सुशासन हा आमच्या सरकारचा पहिल्यादिवसापासून प्रयत्न राहिला आहे. देशात प्रामाणिकपणाच राज्य असलं पाहिजे. हे रामराज्यच आहे, ज्याने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासची प्रेरणा दिली. माझ सरकार गरीबांना समर्पित आहे हे मी 2014 मध्ये सरकार बनल्यानंतरच म्हटलं होतं. आम्ही अशा योजना सुरु केल्या की, त्यामुळे गरीबांच्या अडचणी कमी व्हाव्यात जीवन सोप बनेल”