Shahajibapu Patil : मोठी बातमी, शहाजी बापू पाटील यांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा, गावकऱ्यांसमोर थेटच बोलले

Shahajibapu Patil : काय झाडी काय डोंगर अशा विधानापासून ते विजयी झालो नाहीतर थेट फास घेण्याची भाषा करणाऱ्या शहाजीबापूंनी आता अजून एक बॉम्ब टाकला आहे. त्यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे. त्यांच्या या नवीन पवित्र्याची सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Shahajibapu Patil : मोठी बातमी, शहाजी बापू पाटील यांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा, गावकऱ्यांसमोर थेटच बोलले
आता थेट राजकीय संन्यासाची भाषा
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:51 AM

विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरभरून मतदान झाले. महायुतीची त्सुनामी आली. भाजपासोबत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा मोठं यश खेचून आणलं. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक जण गेले होते. त्यात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे सुद्धा होते. त्यांचं गुवाहाटीतील काय झाडी, काय डोंगर, हे विधान गाजलं होतं. या निवडणुकीत जिंकलो नाही तर फास घेईल असं अतितायीपणाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. हा गड शेतकरी-कामगार पक्षानं पुन्हा ताब्यात घेतला बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले आणि पाटलांना धक्का बसला. आता त्यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे.

नाहीतर मी संन्यास घेणार

माजी आमदार शहाजी बापू पाटील हे पराभवानंतर पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे. यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा

निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

आता वरिष्ठांकडून पद घेऊनच येणार

ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, असे ते म्हणाले. दोन वर्षात ५ हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे. पुढील स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल घेऊनच येणार, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.