Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | Solapur Accident | काम आटोपून घरी निघाले होते, पण वाटेतच काळानं गाठलं, तिघांचा दुर्दैवी अंत

Solapur Accident : या अपघातात किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे या तिघांचा मृत्यू झाला असून राकेश हच्चे हा गंभीर जखमी झाला आहे. राकेश यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Video | Solapur Accident | काम आटोपून घरी निघाले होते, पण वाटेतच काळानं गाठलं, तिघांचा दुर्दैवी अंत
सोलापुरात भीषण अपघात
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 7:59 PM

सोलापूर : सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघांतांची मालिका थांबायचं नाव घेत नाही आहे. रविवारी या मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला होता. काम आटोपून घरी पतरणाऱ्या तिघांवर या अपघातात काळानं घाला घातला. भरधाव स्कॉर्पियो गाडी (Mahindra Scorpio) झाडावर आदळून हा भीषण अपघात घडला. सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील औरादजवळच्या वकील वस्ती इथं हा भीषण अपघात घडला. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. यावरुन या अपघाताची तीव्रता किती भयंकर होती, याची कल्पना करता येऊ शकेल. दरम्यान, सोलापूर-विजयपूर महामार्गावर (Solapur-Vijaypur Highway) गेल्या काही दिवसांत वाढलेले अपघात हा चिंतेचा विषय ठरु लागला आहे.

काम आटोपून घरी निघाले होते, पण…

या अपघातात किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे या तिघांचा मृत्यू झाला असून राकेश हच्चे हा गंभीर जखमी झाला आहे. राकेश यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हे सर्व जण काम आटोपून घरी जायला निघाले होते. पण वाटेतच काळानं त्यांना गाठलं.

सोलापुरामध्ये मंडप आणि लायटींगचे क्रॉन्ट्रॅक्टर करायचं काम या अपघातात मृत्यू झालेले करत होते. औराद इथं ते कामासाठी गेले होते. काम आटपून करुन निघाले असता त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची स्कॉपियो गाडी ही भरधाव वेगात असतानाच झाडावर आदळली. तेरामैल इथ MH 13 Z 9909 नंबरची स्कॉर्पियो कार अपघातग्रस्त झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

अपघातातील मृतांची नावं पुढीलप्रमाणे –

किशोर अण्णाराव भोसले (वय वर्षे 45) राहणार सळई मारुती उत्तर कसबा सोलापूर नितीन भगवान भांगे (वय 32) राहणार निराळे वस्ती सोलापूर व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45) राहणार मोदी सोलापूर

संबंधित बातम्या :

लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, ठाण्याच्या तरुणांची मालवण ट्रीप अधुरी

VIDEO | ड्रायव्हरचा ताबा सुटला, गाडी उलटून महिलेचा जागीच मृत्यू, चिमुरड्यांसह 11 प्रवासी गंभीर

औषधांमुळे डुलकी, अभिनेते हेमंत बिर्जेंच्या कारची दुभाजकाला धडक, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.