सोलापुरात दुचाकीची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, जमावानं आरटीओ पथकाला बेदम बदडलं
आरटीओची गाडी थेट कंटेनरच्या समोर आडवी लावल्याने कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मोहन आदमाने हे कंटेनरला पाठीमागून धडकले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असा आरोप आदमाने यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केला जातोय.
सोलापूर : सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील वडवळ फाट्याजवळ ट्रक (Truck) आणि दुचाकी (Two Wheeler)च्या अपघातात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन दत्तात्रय आदमाने असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर या मृत्यूला आरटीओ अधिकारी कारणीभूत असल्याच्या आरोपातून संतप्त जमावाने आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरटीओ पथकातील तीन जण जखमी झाले आहेत. (One dies in two-wheeler and container accident in Solapur)
जमावाच्या मारहणीत आरटीओ पथकाचे तीन जण जखमी
आरटीओच्या वायुवेग पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी सोनटक्के, पोलीस निरीक्षक राजेश अहुजा आणि चालक शिवाजी गायकवाड हे तिघे जण मारहाणीत जखमी झाले आहेत. शेतकरी मोहन आदमाने हे त्यांच्या दुचाकीवरुन मोहोळवरून लांबोटीच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे वेगवान कंटेनर होता. वडवळ कोळेगाव नजीक आले असता त्या कंटेनरला थांबवण्यासाठी मागून आरटीओची गाडी आली. आरटीओची गाडी थेट कंटेनरच्या समोर आडवी लावल्याने कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मोहन आदमाने हे कंटेनरला पाठीमागून धडकले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असा आरोप आदमाने यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केला जातोय.
संतप्त जमावाने महामार्गही रोखला
यावेळी घटनास्थळी असलेल्या संतप्त जमावाने आरटीओची गाडी फोडली तसेच आरटीओच्या अधिकाऱ्यांना देखील बेदम मारहाण केल्याचा दावा जखमी आरटीओ अधिकाऱ्यांनी केलाय. जमावाने काही काळ महामार्ग देखील अडवून धरला होता. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत मृतदेह मोहोळ येथील शासकीय रुग्णलयात हलविला. तर जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. (One dies in two-wheeler and container accident in Solapur)
इतर बातम्या
Nagpur Crime : नागपुरात गाडी चालविण्यावरुन वाद, दोन गटात हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद