Raj Thackeray : राज ठाकरे एकटेच मर्द, बाकी सगळे…,’ कालीचरण महाराजांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले.. ‘पुढच्या निवडणुकीत बघा काय होतं ते’

आपण धर्मजागरणाचं कर्तव्य बजावत असल्याचे कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो हिंदू हितकी बात करे, उसी को हम मतदान करे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू (Hindutva) हिताची बाजू घेतली तरच त्यांना पाठिंबा राहिल, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे एकटेच मर्द, बाकी सगळे...,' कालीचरण महाराजांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले.. 'पुढच्या निवडणुकीत बघा काय होतं ते'
राज ठाकरे एकटेच मर्द, बाकी सगळे...,' कालीचरण महाराजांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले.. 'पुढच्या निवडणुकीत बघा काय होतं ते'Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 3:24 PM

सोलापूर – राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकटेच मर्द आहेत, बाकी सगळे नामर्द आहेत, अशी टीका कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) केली आहे. आमचा पाठिंबा राज ठाकरेंना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याविरोधात कुणी कितीही बोलत असले तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचेही कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. आपण धर्मजागरणाचं कर्तव्य बजावत असल्याचे कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो हिंदू हितकी बात करे, उसी को हम मतदान करे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू (Hindutva) हिताची बाजू घेतली तरच त्यांना पाठिंबा राहिल, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले आहे. तो नेता कोणत्याही पक्षाचा असला तरी हिंदूंच्या हितासाठी बोलणाऱ्यालाच मतदान होईल, आम्हीही त्याच्याच बाजूने उभे राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढच्या निवडणुकीत दिसेल हिंदू काय करतात ते..

सध्या राज्यात एकमेकांवर आरोपांचं संत्र सुरु आहे, मात्र एक लक्षात ठेवा राज्यातील जनता समजदार आहे, तिला तुम्ही मुऱ्ख ठरवू शसकत नाही, असे महाराजांनी सांगितले आहे. जनतेच्या मनात हिंदू प्रेम आहे, त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दिसेल की हिंदू काय करतील ते, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. हिंदुंना वाटतच असेल की त्यांच्या समस्या संपल्या पाहिजेत, तर कट्टर हिंदू समर्थकांना निवडून द्या, असे आवाहनही कालीचरण महाराजांनी केले आहे. कालीचरण महाराज सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वराच्या दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी शिवतांडव स्तोत्रही पठण केलं.

हे सुद्धा वाचा

राज्यात सध्या हिंदुत्वावरून रणकंदन

राज्यात सध्या हिंदुत्वावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका आणि त्यांना हिंदुंचा मिळणारा पाठिंबा हा वाढला आहे. अगदी अयोध्येपासून लोक राज ठाकरे यांच्या सभेत दाखल होत आहे. भाजपनेही राज ठाकरेंच्या या भूमिकेला भरभरून पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेसह इतर राजकीय पक्ष हे राज ठाकरेंवर टीकेची झोड उडवताना पाहिला मिळत आहे. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करत हिंदूत्व सोडल्याचीही टीका भाजपकडून होत आहे. तर दुसरीकडून शिवसेनाही भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्वासाठी शिवसेनेने सर्वात मोठा त्याग केला आहे. असे शिवसेनेचे नेते वारंवार सांगत आहेत. अशातच कालीचरण महाराज यांनी राज ठाकरेंचं भरभरून समर्थन केल्याने आता यावरही जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.