Shrikant Deshmukh: तू मला अर्धी अधूरं ठेवलंस ना, श्रीकांत देशमुख प्रकरणात महिलेचा तळतळाट, आता ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झालेला असतानाच आता श्रीकांत देशमुख् आणि महिलेची ऑडिओ क्लिपही (Audio Clip Viral)आता प्रचंड व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओमध्ये महिलेने श्रीकांत देशमुख यांना तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना. तुला सगळं अर्धच भेटणार...तू बनणारच नाही आमदार..लक्षात ठेव असा तळतळाट दिला आहे.

Shrikant Deshmukh: तू मला अर्धी अधूरं ठेवलंस ना, श्रीकांत देशमुख प्रकरणात महिलेचा तळतळाट, आता ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:39 PM

सोलापूर: राज्यात शिंदे-फडणवीस गटाने राजकीय वातावरण ढवळून काढलेले असतानाच सोलापूरातील एका घटनेने भाजप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Solapur BJP Leader shrikant deshmukh) यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळासह सगळीकडे खळबळ उडाली. या व्हिडीओमध्ये महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही (Resign) भाजपकडून स्वीकारण्यात आला आहे. हे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता श्रीकांत देशमुख् आणि महिलेची ऑडिओ क्लिपही (Audio Clip Viral)आता प्रचंड व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओमध्ये महिलेने श्रीकांत देशमुख यांना तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना. तुला सगळं अर्धच भेटणार…तू बनणारच नाही आमदार..लक्षात ठेव असा तळतळाट दिला आहे.

 लग्न होऊनही आपल्याबरोबर संबंध

श्रीकांत देशमुख आणि त्यांच्यावर आरोप केलेल्या त्या महिलेची ऑडिओ क्लिप आता प्रचंड व्हायरल झाली आहे. श्रीकांत देशमुखांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर लग्न होऊनही आपल्याबरोबर संबंध ठेवले आहेत, श्रीकांत देशमुख मला फसवत असल्याचा गंभीर आरोप त्या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर भाजपकडून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.

तुझा एवढा सुखी संसार होता ना

श्रीकांत देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता श्रीकांत देशमुख आणि महिलेची ऑडिओ क्लिपही आता प्रचंड व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ती महिला श्रीकांत देशमुखांना विचारत आहे की, लग्न का केलंस…तुझा एवढा सुखी संसार होता ना…तू माझ्याशी लग्न का केलंस सांग…तुझा होता ना सुखी संसार. तुला एवढं बायकोचं प्रेम आहे. तू मला का बोलला,माझे बायकोशी संबंध नाहीत 3 वर्षे झाली. तू काय काय केलंस कारस्थान. तुझ्याबरोबरही तसंच होणार आहे. तू मला आज वागवतोय ना…तुला माझं लक भेटणारच नाही. तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना. तुला सगळं अर्धच भेटणार…तू बनणारच नाही आमदार..लक्षात ठेव. असा तळतळाटही त्या महिलेने श्रीकांत देशमुखांना फोन करून दिला आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुखांच्या त्या व्हिडीओ क्लिपनंतर ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळासह भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.

तुला एवढं बायकोचं प्रेम आहे तरीही…

व्हिडीओतील ज्या महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप केला आहे , त्यामध्ये ती महिला रडत असतानाच तिने फसवल्याचा आरोप श्रीकांत देशमुखांवर केला आहे. 28 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रुममध्ये ती महिला आणि श्रीकांत देशमुख असल्याचे दिसत असून त्या महिलेने आरोप केल्यानंतर तिच्याकडचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न श्रीकांत देशमुख करत आहेत असे दिसत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये महिलेने श्रीकांत देशमुखांना  तुला एवढं बायकोचं प्रेम आहे तरीही आपल्याबरोबर तू खोटं बोलल्याचं त्या सांगत आहेत. आपल्याला फसवली गेल्याची भावना असल्यानेच महिलेने त्यामध्ये शेवटी श्रीकांत देशमुखांना तू बनणारच नाही आमदार असा तळतळाट दिला आहे. आणि हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.