AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात माजी आमदाराच्या कार्यालयात खळबळजनक प्रकार, 80 वर्षाचा वृद्ध इतकं टोकाचं का वागला?

सोलापुरात माजी आमदाराच्या कार्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका 80 वर्षीय वृद्धाने माजी आमदाराच्या कार्यालयात टोकाचा निर्णय घेतला आहे. या वृद्धाने इतका टोकाचा निर्णय का घेतला आहे? असा गूढ प्रश्न आता निर्माण झालाय.

सोलापुरात माजी आमदाराच्या कार्यालयात खळबळजनक प्रकार, 80 वर्षाचा वृद्ध इतकं टोकाचं का वागला?
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 8:37 PM

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 27 जानेवारी 2024 : सोलापुरात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयामध्ये एका वृद्धाने स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही माकपची माजी कार्यकर्ता होती. त्यांचं नाव अल्लाउद्दीन शेख असं होतं. विशेष म्हणजे ते 80 वर्षांचे होते. त्यांनी अचानक नरसय्या आडम यांच्या कार्यालयात स्वत:ला का संपवलं? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तसेच या वृत्तामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. शेख यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबतची माहिती तरी अद्याप समोर आलेली नाही. संबंधित घटना ही दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयामध्ये घडली आहे.

अल्लाउद्दीन शेख यांनी संबंधित कृत्य करण्याआधी माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यालयात कोणी नसताना त्यांनी स्वत:ला संपवून घेतलं. संबंधित प्रकार समोर आला तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती हा आमचा कार्यकर्ता नाही. यापूर्वी ते माकपचे कार्यकर्ते होते. मात्र आता त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असं नरसय्या आडम यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयुष्यात असा टोकाचा निर्णय घेऊ नये

आयुष्य खूप सुंदर असतं. ते आपल्याला एकदाच मिळतं. त्यामुळे ते आपण जपायला हवं. आयुष्यातील सुंदर क्षण आपण जपायला हवेत. चांगल्या क्षणांची आठवण कायम मनात साठवून ठेवायला हवी. काहीवेळा अडचणी येतात. पण त्या अडचणींच्या काळात नैराश्यात न जाता त्यांचा सामना करता यायला हवा. अडचणींचा सामना करायलाच हवा. कारण या अडचणींचा सामना केल्यानंतर जे यश आपल्याला मिळतं ते खूप मोठं असतं. त्यामुळे आपण समृद्ध होतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करुन पुढे चालत राहणं जास्त आवश्यक आहे. काही जण नैराश्यात जावून स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. पण तसं करणं योग्य नाही. याउलट आपण संघर्ष करायचा आणि यशस्वी व्हायचं. कारण यश येतं तेव्हा भरपूर आनंद घेऊन येतं.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.