सोलापूरातील पेनूर अपघातातील मृतांचा आकडा 6 वर; दोन कारची समोरासमोर झाली होती धडक
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे हा अपघात झाला असून र्पिओ आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूरः सोलापूरमध्ये भीषण अपघातात (Solapur Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू (Three Death) झाला होता. मात्र आता या अपघातातील मृतांचा आकडा सहाच्या वर पोहचल्याची माहिती देण्यात आली. मोहोळ तालुक्यातील पेनूर (Penur Mohol Solapur) येथे हा अपघात झाला असून स्कॉर्पिओ आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. तर जखमींना मोहोळमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात मोहोळमधील खान कुटुंबीयांमधील सदस्यांचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.
सध्या पंढरपूर-मोहोळ रस्त्याचे काम सुरु असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
सध्या पंढरपूर-मोहोळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ आणि लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानीक रहिवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.
रस्ताच्या कामामुळे अपघात
या अपघातामुळे काही काळ या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंत बघ्यांचा गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनस्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जखमींना मोहोळच्या रुग्णालयात दाखल
या अपघातात जखमी झालेल्यांना मोहोळच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. समोरासमोर जोरदार धडक बसल्याने या अपघातात दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये जागीच ठार झाली आहे. तर जखमींनी मोहोळमधील जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले गेले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.