कुठे मुख्यमंत्रिपदासाठी साकडं, तर कुठे मंत्रिपदासाठी बॅनरबाजी; महायुतीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी अशा केल्या भावना व्यक्त

Devendra Fadnavis Maharashtra New CM : कुठे मंत्रिपदासाठी तर कुठे मुख्यमंत्रिपदासाठी; महायुतीच्या नेत्यांचं विठ्ठल-रुक्मिणीला साकडं

कुठे मुख्यमंत्रिपदासाठी साकडं, तर कुठे मंत्रिपदासाठी बॅनरबाजी; महायुतीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी अशा केल्या भावना व्यक्त
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 10:25 AM

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापर्यंत झालेली नाही. अशातच महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते हे आपल्या नेत्याने मुख्यमंत्री आणि मंत्री व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी सोलापुरात विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातलं आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे विठ्ठल मंदिरात भजन किर्तन करत विठ्ठलाला साकडं घातलं आहे. विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांकडून भजन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत तर आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळावे यासाठी घालण्यात साकडं घालण्यात आलं आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले सुभाष देशमुख यांनाही मंत्रिपद देण्यासाठी साकडं घालण्यात आलं.

पालमंत्रिपदासाठी फिल्डिंग

धाराशिवचं पालकमंत्रिपद कुणीकडे जाणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. जिल्ह्यात आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्या आमदारांचे भावी पालकमंत्री असे बॅनर लावत आहेत. तुळजाभवानीला साकडे आणि महाआरती घालत आहेत.

दोघांच्याही समर्थकांनी आपापल्या नेत्याचे बॅनर गावोगावी लावले आहेत. मात्र या नेत्यांचं मंत्रीपद कधी ठरणार याची वाट कार्यकर्ते पाहात आहेत. मागील अडीच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे अडीच वर्ष धाराशिवचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मंत्रिपदांची संधी मात्र हुकली होती. त्यामुळे यावेळी नवीन सरकारमध्ये धाराशिवचे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार याबाबत जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहेत.

परळीत धनंजय मुंडेंसाठी बॅनरबाजी

बीडच्या परळी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देत भावी गृहमंत्री या आशयाचे बॅनर झळकत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याने अभिनंदन करण्यात आलंय. तर याच बॅनरवर भावी गृहमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. परळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल एक लाख 40 हजार मताधिक्याने धनंजय मुंडे विजयी झाले आहेत.

एवढ्या मोठ्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे आता महायुतीला मिळालेल्या यशात धनंजय मुंडे यांना चांगले स्थान मिळावं अशी अपेक्षा मुंडे समर्थक करत आहेत.

'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.