मोठी बातमी : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?; नाना पटोलेंची महत्वाची प्रतिक्रिया

Congress Leader Nana Patole on Vishal Patil Karvai and Loksabha Election 2024 : सांगलीतील महाविकास आघाडीतील संघर्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटलांवरील कारवाईच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?; नाना पटोलेंची महत्वाची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 8:09 PM

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला. काँग्रेस या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असतानाच शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली. यानंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी या जागेवर काँग्रेसच लढणार असल्याची भूमिका घेतली. पण पक्षश्रेष्ठींकडून त्यांना हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळाला. आघाडी धर्म मोडल्याने विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते सोलापुरात बोलत होते.

नाना पटोले काय म्हणाले?

सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर नाना पटोले यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडीच्या आघाडी धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ देणार नाही.आम्ही सामंजस्याने याबाबत निर्णय घेत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

पवार कुटुंबावर पटोले म्हणाले…

बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. त्यामुळे पवार विरूद्ध पवार अशी बारामतीत राजकीय परिस्थिती आहे. यावर नाना पटोले यांनी भाष्य केलंय. शरद पवार किंवा अजित पवार यांच्या कौटुंबिक वादात मी काहीही बोलणार नाही, असं नाना पटोले म्हणालेत.

राम सातपुते यांनी विधानसभेत मराठा समाजाचा धडधडीत अपमान केला. दोन वेळा हा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही माफी मागायला सांगितली. राम नाव ठेवल्याने कोणी ‘श्रीराम’ बनत नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीका केली आहे. अभिजीत पाटील हा प्रामाणिक माणूस आहे. त्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार आहोत. अशाप्रकारे एकाद्याला प्रलोभन दाखवणे चुकीचं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं.

नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात

भारताच्या रुपयापेक्षा बांगलादेशचा टक्का पुढे गेला. मग ते पुढे गेले का आपण पुढे गेलो ? नरेंद्र मोदी देशाची भूमिका ठामपणे मांडतात मात्र चीनलाच बोलायला घाबरतात. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध देशातील जनता अशी आहे. भाजप विरुद्ध देशातील जनता अशी निवडणूक आहे. नरेंद्र मोदींनी विकासाचे स्वप्न दाखवले. पण शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.