ऐन मतदानाच्या दिवशी सोलापुरात गेम पलटला; सुशील कुमार शिंदे यांचा मोठा डाव, ठाकरेंना धक्का

Sharad Koli Allegation on Praniti Shinde : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी हा आरोप करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

ऐन मतदानाच्या दिवशी सोलापुरात गेम पलटला; सुशील कुमार शिंदे यांचा मोठा डाव, ठाकरेंना धक्का
सुशील कुमार शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 3:22 PM

विधानसभा निवडणुकीचं आज मतदान होत आहे. अशात ऐन मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये गेम पलटला आहे.  काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. दक्षिण सोलापूर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात काँग्रेस पक्ष अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर केला आहे. याचमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुशील कुमार शिंग आणि प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गट आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात असताना काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी संतापले आहेत.

शरद कोळी यांची प्रणिती शिंदेंवर टीका

प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहे. भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात. त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे. यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही. शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे, असं म्हणत शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे. लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Non Stop LIVE Update
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड.
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप.
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार.
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा.
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.