Supriya Sule : भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा

Supriya Sule on BJP Devendra Fadnavis : भारतीय जनता पक्ष नसून हा तर..., खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा... भाजपवर टीका, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा, पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्काबाबतही मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

Supriya Sule : भारतीय जनता पक्ष नसून हा तर...; सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 3:54 PM

सोलापूर | 08 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना सगळं चालतंय. हे खुनी सरकार आहे. 100 पेक्ष अधिक लोकांची हत्या या खोके सरकारने केली आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आमचा पक्ष दडपशाहीचा पक्ष नाही. लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. अजितदादा पवार गटात जाऊन जयंतराव पाटील मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. पण इलेक्शन कमिशनमध्ये छगन भुजबळ यांची टीम गेल. परीक्षेला बसण्याआधी निकाल कसे कळतो? म्हणजे दिल्लीची अदृश्य शक्ती यामागे आहेत. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्र विरोधात कटकरस्थान करतेय, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

शरद पवारसाहेब किंवा मी, आम्ही कुणीही प्रफुल पटेल यांच्याशी संपर्कात नाही. हवं तर आमचा मोबाईल चेक करा. खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जातंय. प्रफुल पटेल जे बोलत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्कात नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

समरजित घटगे यांना विनंती आहे, की त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलं. ते आज पालकमंत्री आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपने खोटे आरोप केले असतील. तर त्यांनी राष्ट्रवादीची माफी मागाली. नाहीतर मुश्रीफ यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून बाहेर काढलं आहे, हे मान्य करावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

माझ्या गाडीला फास्ट टॅग आहे. त्यामुळे मला पैसे आकारले जातात, असं म्हणत टोलच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. स्मार्टसिटीच्या विरोधात आम्ही बोलून बोलून थकलो आहोत. मात्र त्यावर कोणीही लक्ष देत नाही, असंही त्या म्हणाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.