Solapur Ujani Dam Water : सोलापूरचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला, पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता, चंद्रभागेत शेतकऱ्यांचा आक्रोश, मनसेकडून अध्यादेशाची होळी

जोपर्यंत ही योजना रद्द केली जाणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आज येथे दिला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) यांची चांगलीच अडचण झाली आहे.

Solapur Ujani Dam Water : सोलापूरचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला, पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता, चंद्रभागेत शेतकऱ्यांचा आक्रोश, मनसेकडून अध्यादेशाची होळी
सोलापूरचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला, पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता, मनसेकडून अध्यादेशाची होळीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 4:15 PM

सोलापूर : गेल्या अनेक वर्षात उजणी धरणाच्या (Ujani Dam Water Supply) पाणीपुरवठ्यावरून वाद झाल्याचे आपण पाहिले आहे. आता पुन्हा हाच पाणीप्रश्न पेटला आहे. कारण उजनी धरणातून इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात आज पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ही योजना रद्द केली जाणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आज येथे दिला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) यांची चांगलीच अडचण झाली आहे. कारण एका राष्ट्रवादीच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा विरोध झाला आहे.

भरणेंविरोधात मनसे आक्रमक

सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या हक्काचे पाणी पळवले असून त्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकु देणार नाही असा इशारा मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिलाय. स्वतःच्या इंदापुरसाठी पुन्हा पालकमंत्र्यांनी उजनी धरणात हात घातला आहे. लाकडी -लिंबोडी ही योजना इंदापूर मधील 10 तर बारामती मधील 7 गावांना या योजनेतून पाणी मिळणार असtन या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलीय. दरम्यान पालकमंत्री भरणेचा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी मोडनिंब येथे घोषणाबाजी करीत निषेध करुन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या शासनाच्या अध्यादेशाच्या पत्राची होळी करण्यात आली.

उजनी पाणी संघर्ष समितीचे आंदोलन

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पवारांचे एजंट म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय तसेच सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येवून आंदोलन केले आहे. पालकमंत्री म्हणून भरणे यांनी दोन वर्षात एकही योजना आणली नाही मात्र उजनीतील पाण्याचा कोणताही संबंध नाही तिथे दरोडा टाकून त्यांनी 350 कोटी रुपये त्यांनी स्वतःच्या तालुक्यासाठी आणि बारामतीसाठी नेले. बारामतीकरांचा दलाल म्हणून, बारामतीकरांचा एजंट म्हणून भरणे यांनी प्रत्येक ठिकाणी दरोडा घालण्याचे काम केले, असा आरोप समितीने केला आहे.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ नये यासाठी अट्टाहास

तसेच कोव्हिडमधील भ्रष्टाचारासोबतच सोलापूर जिल्ह्यातील एकमेव धरण असलेले पाणीदेखील नेत आहेत. उजनीतून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी दिले जाते. खडकवासला, निरेचे पाणी बारामतीत नेले त्यामुळे इंदापूरमध्ये येणारे सर्व पाणी बारामतीत नेले जाते. खडकवासला आणि इतर धरणातून आजच्या लाकडी निंबोडी योजनेला पाणी येणे अपेक्षित होते ते आज उजनीतून दिले जातेय. तसेच सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ नये म्हणून हा टाकलेला डाव आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे दीड वर्षे झाले. पालकमंत्री आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत एकदाही चंद्रभागेत पाय ठेवला नाही त्यामुळे त्यांना बुडवण्याचे काम आम्ही चंद्रभागेत करतोय, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.