Indapur crime| 84 किलोचा रुबाबदार ‘शेरा’ कुणी पळवला? Indapur तालुक्यातील बोकडाच्या चोरीची चर्चा

अनेक गावागावांत सार्वजनिकरीत्या बोकड कापून धुळवड साजरी करण्याची पद्धत आजही रूढ आहे.अनेक ठिकाणी घरोघरी बोकड, मेंढा, कोंबड्या, मासे मोठ्या प्रमाणात यावेळी लोक ताव मारत असता. या दिवशी मटण गावातील प्रत्येक घरात पाहावयास मिळते त्यामूळे या वेळी बोकडांची किंमत ही वाढलेली असते.. याचाच फायदा भुरटे चोर घेतात व शेतकऱ्यांच्या पाळलेल्या बोकडांवर नजर ठेवत रातोरात ते चोरी करत असतात.

Indapur crime| 84 किलोचा रुबाबदार 'शेरा' कुणी पळवला? Indapur तालुक्यातील बोकडाच्या चोरीची चर्चा
बिटल जातीच्या बोकडाची व उस्मानाबादी शेळीची चोरी
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 5:37 PM

इंदापूर –इंदापुरातील 84 किलोचा प्रसिद्ध बोकड चोरीला गेल्यानं चर्चांना उधाण आलंय. हा बोकड कुणी चोरला, यावरुन गावागावात चर्चा रंगली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातली सरडेवाडी जवळच्या शिंदेवस्तीत ही घटना घडली आहे. एका युवा शेतकऱ्याच्या(Young Farmer) शेळी फार्ममधून हा बोकड चोरीला गेलाय. धुळवडीच्या मुहूर्तावर इंदापुरात झालेल्या बोकडाच्या चोरीनं शेतकरी हवालदिल झाला आहे. फक्त बोकडच नव्हे तर या शेळी देखील या फार्ममधून चोरीला गेली आहे. या चोरीप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. सध्या पोलिस याप्रकरणी अधित तपास करत आहेत. बिटल जातीचा बोकड आणि उस्मानाबादी शेळीची (Osmanabadi goat) चोरी झाले आहेत. यातील बोकडाचं वजन 84 किलो असून त्याची किंमत जवळपास 40 हजार पेक्षा अधिक आहे. तर शेळीची किंमत 18 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातंय. शेळी आणि बोकड चोरीला गेल्याचं कळल्यानंतर युवा शेतकरी अजय यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.

धुळवड च्या मुहूर्तावर सर्रास होते बोकडांची चोरी

होळीचा दुसरा दिवस हा करीचा मानला जातो, पुरणपोळीचा गोडवा चाखल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिखटाचा बेत असतो. अनेक गावागावांत सार्वजनिकरीत्या बोकड कापून धुळवड साजरी करण्याची पद्धत आजही रूढ आहे. अनेक ठिकाणी घरोघरी बोकड, मेंढ्या, कोंबड्या, मासे मोठ्या प्रमाणात यावेळी लोक ताव मारत असतात. या दिवशी जवळपास गावातील प्रत्येक घरात मटणाचा बेत पाहायला मिळतो. त्यामुळे यावेळी बोकडांची किंमत ही वाढलेली असते. याचाच फायदा भुरटे चोर घेतात. शेतकऱ्यांच्या पाळलेल्या बोकडांवर नजर ठेवत रातोरात चोरी करतात. चोरीची अशी अनेक उदाहरण महाराष्ट्रात होळीच्या दरम्यान पाहायला मिळतात.

84 किलोच्या बोकडानं नाव ‘शेरा’

84 किलोच्या बोकडानं नाव ‘शेरा’ असं आहे. युवा शेतकरी अजय शिंदे यांनी अज्ञातांविरोधात चोरीची तक्रार पोलिसांत दिली आहे. अजय सुभाष शिंदे हे इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील शिंदेवस्ती येथे राहतात. याच ठिकाणी त्याचा शेळी फार्म आहे. सुमारे दोन वर्षे वयाचे बीटल जातीचे बोकड काळे रंगाचे असून त्याच्या चेहऱ्याची ठेवन इतरांपेक्षा वेगळी होती.

चोरी झाल्याचं कळलं कसं?

अजय शिंदे यांनी शेळी फार्म चालू करून फक्त एकच वर्ष झाले आहे. शिंदे वस्तीच्या शेळी फार्मवर 14 लहान-मोठ्या शेळ्या, 7 लहान-मोठी बोकडे असे एकूण 21 शेळ्या आणि बोकडे होती. दोन दिवसांपूर्वी सकाळी चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना जाळी तोडल्याचा प्रकार दिसून आला. आतमध्ये पाहिले असता सर्वात मोठा असणारा बोकड व मोठी शेळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात असणाऱ्या वस्त्यांवर चौकशी केली असता त्यांना हे शेळी, बोकड दिसून आले नाही. शिंदे यांनी त्याचे जवळचे मित्र इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जावून या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली. आता इंदापूर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दोन वर्षाच्या FD तूनही मिळणार नाही एवढा परतावा मिळाला आहे. कसा आणि कुठे फायदा झाला ते वाचा

Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर

Aurangabad | Heat Wave चा तडाखा जायकवाडी धरणाला! दिवसाला औरंगाबादच्या गरजेपेक्षा दहापट बाष्पीभवन !

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.