या ७० वर्षीय आजीबाईला सलाम केलाच पाहिजे; शेळ्या राखून विठुरायाच्या चरणी अर्पण केली लाखोची देणगी
फुलाबाई यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलून ही दाखवला होता.
सोलापूर : पंढरपूरच्या विठोबा माऊलीची भक्ती काही औरचं. भक्त पंढरपूरला (Pandharpur) भेट दिल्यानंतर माऊलीसमोर नतमस्तक होतात. शक्य तशी देणगी देतात. पण, एका आजीबाईची बातच न्यारी. या आजीबाईने पाच वर्षे मेहनत केले. शेळ्या राखल्या. त्या विकून त्यातून पै-पै जमा केला. त्यानंतर लाख रुपयांची देणगी दिली. यामुळे या आजीबाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. फुलाबाई चव्हाण (Phulabai Chavan) असं या आजीबाईचं नाव. विठुरायाला देणगी देण्याचं त्यांनी ठरवलं. पण, कुणाचीही मदत त्यासाठी घेतली नाही. स्वतः कष्ट करून पैसे जमा केले. शेवटी एक लाख ११ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतरच त्यांच्या मनाला समाधान झाले. त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं.
एक लाख अकरा हजारांची देणगी
आजीबाईने शेतात काबाड कष्ट करून व शेळ्या मेंढ्या विकून पै-पै जमा केला. त्यांचं वय 70 वर्षे आहे. या आजीने विठुरायाला तब्बल एक लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. विठ्ठल भक्त फुलाबाई विष्णू चव्हाण असं या दानशूर आजीचे नाव आहे. सांगोला तालुक्यातील शिवणे येथे त्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. फुलाबाई यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलून ही दाखवला होता. पण देणगीसाठी कोणाकडे पैसे मागणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी रानामाळात शेळ्या मेंढ्या राखून पै पै जमा केले.
आजीबाईच्या दानशूरतेचे सर्वत्र कौतुक
आज त्यांनी जवळचे दीड तोळे सोन्याचे दागिने मोडून आणलेले 80 हजार आणि जवळचे 31 हजार रुपये असे एकूण 1 लाख 11 हजार रुपयांची देणगी त्यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केलीय. फुलाबाई चव्हाण यांच्या दानशुरतेचं कौतुक होतंय. एकीकडं लाखो रुपये असताना काही जण दान करायला मागे-पुढं पाहतात. अशावेळी घरी काही नसताना. कष्ट करून पैसे जमा केले. ते विठ्ठलाच्य चरणी अर्पण केले. अशा या दानशूर आजीबाईला मानाचा मुजरा.