Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अर्भक रस्त्यावर सोडले, तिघांना अटक

फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे त्यांच्या कुंटुबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चालले होते. यावेळी नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्या समोर त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले होते. वसेकर यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली.

Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अर्भक रस्त्यावर सोडले, तिघांना अटक
पंढरपूरमध्ये रस्त्यावर अर्भक सोडल्याप्रकरणी तिघांना अटकImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 4:18 PM

पंढरपूर : अल्पवयीन मुलीला माता बनवून तिघे पुरुष जातीचे अपत्य (Infant) रस्त्यावर फेकून पलायन करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच सदर अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात (Detained) घेण्यात आले आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (Prevention of Child Sexual Abuse Laws)नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक करण्यात आली होती आणि तिसऱ्याचा शोध सुरु होता. दरम्यान तिसरा आरोपी विशाल टापरे याला पोलिसांनी कराड येथून आज सकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून देखील आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे. (Three arrested for leaving infant on the road in Pandharpur)

आरोपींनी वेळोवेळी पीडितेचे लैंगिक अत्याचार केले

फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे त्यांच्या कुंटुबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चालले होते. यावेळी नारायण चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीच्या समोर त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले होते. वसेकर यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला असता अल्पवयीन पिडीत मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीएनए चाचणीसाठी नमुने पाठवले

अल्पवयीन मुलीवर तिघांनी आत्याचार केले आहेत. त्यामुळे जन्मलेल्या आणि फेकून दिलेल्या बाळाचा नेमका पिता कोण हा प्रश्न सध्या कायम असून डीएनए तपासणीतून याचे उत्तर मिळणार आहे. त्यासाठी बाळ, अल्पवयीन माता आणि अत्याचारी दोन आरोपींचे नमुने घेवून डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता तिसरा आरोपीही सापडला असून त्याचेही नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. (Three arrested for leaving infant on the road in Pandharpur)

इतर बातम्या

Video Photo: पोरगी टल्ली झाली, मुंबई पोलीसांची गच्ची पकडली, मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा

Palghar | तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.