दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी विठ्ठ्ल रुक्मिणी मंदिराचा मोठा निर्णय…

चैत्री यात्रेच्या निमित्ताने मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी विठ्ठ्ल रुक्मिणी मंदिराचा मोठा निर्णय...
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 6:49 PM

सोलापूरः पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाचा काळा बाजार होत असल्याची बाब tv 9 ने समोर आणली होती. त्यानंतर मंदिर समितीने दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी आज झालेल्या मंदिरे समितीच्या बैठकीत मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गुढी पाडव्यादिवशी तुळशी पूजा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्री आणि मंदिर परिसरात स्वच्छता राखली जावी. यासाठी आता मंदिर समितीही योगदान देणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून स्वच्छ पंढरपूर रहावे. यासाठी घंटागाडी देखील विकत घेतली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. तर यावेळी कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

चैत्री यात्रेच्या निमित्ताने मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळ्या विठुरायाची तुळशी पूजा आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

स्वच्छतेबाबतही आज झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने त्याचा फायदा लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा होणार आहे.

एकीकडे पढंरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी काळा बाजार होत असल्याचे टीव्ही नाईनने चव्हाट्यावर आणले होते. त्यानंतर त्याविषयी प्रशासनाकडून गांभीर्याने भूमिका घेत विचार करण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिरामध्ये काळा बाजार होत असल्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दर्शनातील काळा बाजार थांबण्यास मदत होईल असंही यावेळी सांगणण्यात आले आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.