National kusti championship : कविटगावच्या पैलवानाचं ‘यश’; कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई
पटना येथे 15 वर्षाच्या आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National kusti championship) नुकत्याच पार पडल्या. त्या स्पर्धेत करमाळा (Karmala) तालुक्यातील कविटगावचा पैलवान यश शिवाजी सरडे (Yash Sarde) याने 44 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक मिळविले आहे.
सोलापूर : पटना येथे 15 वर्षाच्या आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National kusti championship) नुकत्याच पार पडल्या. त्या स्पर्धेत करमाळा (Karmala) तालुक्यातील कविटगावचा पैलवान यश शिवाजी सरडे (Yash Sarde) याने 44 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक मिळविले आहे. त्यास रुस्तम ए हिंद पैलवान विजय गुटाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यश हा कविटगाव येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. त्याबरोबरच पुणे येथील रुस्तम ए हिंद अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 29 ते 31 मार्चदरम्यान पटना, बिहार येथे ही स्पर्धा पार पडली. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जागतिक दर्जाच्या मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, भोसरी पिंपरी चिंचवड येथे निवड चाचणी पार पडली होती. निवड चाचणीत 488 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
देशभरातील कुस्ती स्पर्धक आखाड्यात
पटना येथे देशभरातील कुस्तीपटू आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आखाड्यात उतरले. राष्ट्रीय ज्युनियर कुस्तीमध्ये, ग्रीको रोमनला बिहारचे कुंदन कुमार ठाकूर आणि कमलेश यादव यांनी प्रशिक्षित केले. यशवंत यादव आणि अमरकांत झा फ्रीस्टाईलमध्ये तर उदय तिवारी मुलींच्या गटात राहिले. संघाचे व्यवस्थापक रामपूजन साहनी यांनी काम पाहिले..