Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या अपघातामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर महामार्गावर विशेष तपासणी मोहीम, परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गांवरील वाढते अपघाती मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक विभागाने गेल्यावर्षी तपासणी मोहीम राबविली होती. आता पुन्हा मुंबई ते पुणे जुन्या आणि नवीन महामार्गांसह पुणे-काेल्हापूर मार्गावरही तपासणी मोहीम सुरु झाली आहे.

वाढत्या अपघातामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर महामार्गावर विशेष तपासणी मोहीम, परिवहन विभागाचा निर्णय
mumbai-pune-expresswayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 9:28 PM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर वाढत्या अपघाती मृत्यूमुळे परिवहन विभागाने डिसेंबर 2022 ते मे 2023 अशी सहा महिन्यांची विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली होती. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा अपघातांचे प्रमाण 24 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 21 टक्के घटले होते. त्यामुळे याच धर्तीवर आता पुणे-कोल्हापूर महामार्गावर अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी 5 ऑक्टोबरपासून तीन विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आणि मुंबई – पुणे ( राष्ट्रीय महामार्ग क्र.48 ) महामार्गावरही 5 ऑक्टोबरपासून पुन्हा तीन महिन्यांची विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर वेगाच्या नशेमुळे अनेक अपघाती मृत्यू होत असल्याने परिवहन विभागाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यांपासून सहा महिन्यांची विशेष तपासणी मोहीम राबविली होती. आता पुन्हा तिन्ही मार्गांवर ही मोहिम सुरु झाली आहे. यासाठी एका तपासणी पथकात किमान 2 मोटार वाहन निरीक्षक आणि 2 सहायक मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी नेमले आहेत. ही तपासणी पथके विविध पाळ्यांमध्ये महामार्गांवर तपासणी करणार आहेत. या मोहिमेत वेग मर्यादेचे उल्लंघन करुन धावणारी वाहने, चुकीच्या मार्गिकेतून जाणारी तसेच मार्गिका बदलणारी वाहने, विना सीटबेल्ट जाणारी वाहने, रस्त्याच्या कडेला अवैध पार्कींग, उतारावर न्युट्रल गेअरमध्ये चालणारी अवजड वाहने यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

दर सोमवारी आढावा

या तपासणी मोहीमेत महामार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रांना ( ब्लॅक स्पॉट ) वारंवार भेटी देणे, ब्लॅक स्पॉटमधील त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करणे, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानूसार वायुवेग पथकांनी कामगिरी करणे, तसेच दर सोमवारी आठवडाभराच्या कामगिरीचा परिवहन उपायुक्त ( रस्ता सुरक्षा ) मार्फत परिवहन आयुक्त आढावा घेणार आहेत. यावेळी पब्लिक एड्रेस सिस्टीमद्वारे चालकांचे प्रबोधन करणे त्यांचे समुदेशन करणे त्यांना सूचना देणे अशा प्रकारे मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेवर देखरेख ठेवण्यासाठी पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.