अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, परिवहन मंत्र्यांची घोषणा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत (ST employee get extra income during lockdown) आहेत.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, परिवहन मंत्र्यांची घोषणा
Follow us
| Updated on: Apr 06, 2020 | 11:54 PM

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत (ST employee get extra income during lockdown) आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब (ST employee get extra income during lockdown) यांनी आज (6 एप्रिल) केली.

अनिल परब म्हणाले, “23 मार्च पासून पुढील तीन आठवडे संपूर्ण देशात “लॉकडाऊन” जाहीर करण्यात आले. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली. त्यानुसार 23 मार्चपासून मुंबई आणि उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.”

दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे, पालघर, रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळमार्फत करण्यात आली आहे. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यवर जात असताना मास्क आणि सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

दरम्यान, दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सध्या 500 च्यावर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. तर देशात 4 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.