St worker Strike : संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, राज्यभर भिक मागत आंदोलन

हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले, तसेच हजारो कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. कित्येक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा भिकमांगो आंदोलन केलं आहे.

St worker Strike : संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, राज्यभर भिक मागत आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांचं भीक मांगो आंदोलन
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 4:59 PM

मुंबई : जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Worker Strike) सुरू आहे. जवळपास पंधरा दिवस आझाद मैदानात आंदोलन चालल्यावर राज्य सरकारने (Anil Parab) याची दखल घेत, ऐतिहासिक पगारवाढ केली. मात्र तरीही काही कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम राहिल्याने काही मोजकेच कर्मचारी कामावर हजर राहिले. त्यानंतर ज्या एसटी संघटनेने संप पुकारला होता, त्या एसटी संघटनेनेही संप मागे घेत असल्याची घोषणा केली. तरीही या संपावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले, मात्र अजूनही काही कर्मचारी संपावर आहेत. अनेकदा अल्टिमेटम देऊनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने शासनाने कठोर पाऊलं उचलत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला, त्यात हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले, तसेच हजारो कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. कित्येक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा भिकमांगो आंदोलन केलं आहे.

राज्यभर भिकमांगो आंदोलन

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज भिकमांगो आंदोलन केलय.’सरकार तुपाशी, कर्मचारी उपाशी’ असे फलक हातामध्ये घेवून एसटी कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ फिरून भिक मागत हे आंदोलन केले. विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने सरकारला जाग आणण्यासाठी आज सातारा आगारात कर्मचाऱ्यांकडून भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

नांदेडमध्ये आज भीक मांगो आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचारी आणि पोलिसांत वादावादी झालीय. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागत मंत्री अशोक चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली होती, त्यावेळी या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवले, यावेळी आंदोलक आणि पोलिसांत जोरदार शाब्दिक चकमक रंगली, शेवटी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना माघार घेत बस स्थानकाकडे पाठवले, यावेळी एसटी कर्मचाऱ्यानी पोलिसांच्या विरोधात देखील नारेबाजी करत संताप व्यक्त केलाय. या आंदोलनातून जमा झालेले 3583 रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यानी सांगितलंय. विलीनीकरण करा अशी मागणी करत एसटी कामगार आज प्रजासत्ताक दिनी थेट दादर सेना भवनवर धडकले. एसटी कामगारांनी झोळी फिरवत भीक आंदोलन सुरू केले आणि मुख्यमंत्री साहेब , परिवहन मंत्री भीक द्या अशा घोषणा दिल्या.

परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले?

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच सहानभुतीनं विचार केलाय. एसटी तोट्यात असताना देखील जवळपास 41 टक्यांची भरीव परागवाढ कामागारांना दिलीय. कामगारांशी सतत संपर्क ठेवून देखील काही कामगार विलिनिकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपत नाहीये. शासन आपल्या परीने संप मिटावा म्हणून प्रयत्न करतंय, परंतू विलिनिकरणाचा मुद्दा उच्च न्यायलयाच्या खंडपीठाने एका समितीसमोर ठेवलाय. समिती त्यावर अभ्यास करून निर्णय़ देणार आहे. म्हणून तो मुद्दा आमच्या हातात नाही. हे वारंवार आम्ही कर्मचाऱ्यांना समजवून सांगतोय परंतू कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. आता 12 आठवड्यांचा कालावधी संपत आलाय. लवकरात लवकर विलिनिकरणावर समिती आपलं म्हणणं मांडेल परंतू त्यासाठी लोकांना वेठीला धरणं योग्य नाही. लोकांच्या चुकीच्या पद्धतीने वेठीला धरलं गेलंय, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

टिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, अनेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून 175 फाईल ताब्यात घेतल्या? खळबळ माजवणारे प्रकरण काय?

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.