Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kunal Kamra : वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा फरार, शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कुठे लपला कॉमेडियन ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली असून त्यामुळे नवी ठिणगी पडली आहे. आता हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाल्याचे वृत्त आहे.

Kunal Kamra : वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा फरार, शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कुठे लपला कॉमेडियन ?
kunal kamra Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 12:31 PM

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरू चांगलाच वाद पेटला असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. त्याच हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली असून त्यामुळे नवी ठिणगी पडली आहे. आता हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने केलेल्या हंगाम्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा काल रात्री मुंबईतून पळून गेला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पाँडिचेरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि खार पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. आणि आता पोलीस कुणाल कामराचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

एका कार्यक्रमात, शोमध्ये कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य करत विडंबनात्मक गाणं तयार केलं होतं. एकनाथ शिंदे हे बंड करत शिवसेनेमधून बाहेर पडले, राष्ट्रवादीचे दोन गट झाले, त्यावर या गाण्यातून प्रकाश टाकण्यात आला. “आधी शिवेसना भाजपमधून बाहेर आली. मग, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला 9 ऑप्शन्स दिले दिली, त्यात सगळे कन्फ्यूज झाले” असंही कुणालने म्हटलं.

‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये…. ‘ असे गाण्याचे बोल असून त्यात त्याने एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्याच रोख त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे शिवसैनिक बरेच आक्रमक झाले आहेत. ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. तर शिंदे गटाचे नेत संजय निरुपमही भडकले असून आज सकाळी 11 वाजता कुणाल कामराला चोपणार असा इशारा निरुपम यांनी ट्विटमधून दिला.

वादांशी जुनं नातं

कुणाल कामराचं वादांशी जुनं नातं आहे. काही वर्षांपूर्वी त्याने विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद घातला होता. त्यानंतर त्याला प्रवास करण्यास विमान कंपनीने बंदी घातली होती. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाससोबतही कुणाल कामरा यांचा सोशल मीडियावर वाद झाला होता.

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....