LIVE: दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक, शेतकरी संघटनांसोबत चर्चा होणार
कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत (Strike Protest of Milk producer Farmer).
मुंबई : राज्यभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत (Strike Protest of Milk producer Farmer). अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे देखील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यात किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह अनेकजण सहभागी झाले आहेत.
LIVE Updates
- बीडमध्ये दुधप्रश्नावर महादेव जानकर बीडमध्ये दाखल, दूध पॅकेट देऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार, निवासी जिल्हाधिकारी यांनी जानकरांचं दूध नाकारलं, काही काळ कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण
- सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडणार, राजू शेट्टी शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांचे उद्याचे आंदोलन फक्त दाखवण्यापूरते : विनायक मेटे
- दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान द्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन, 1 ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
- दूध दरवाढीसाठी भाजपचं आंदोलन, संगमनेर तालुका भाजपच्यावतीने आंदोलन, प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं, फिजीकल डिस्टन्सिंगचेही पालन
- भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यांच्या काळात सलग 3 वर्षे दुधाचे दर कोसळले, सर्व शेतकरी 3 वर्षे आंदोलन करत होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, शेवटी सरकार जाताना त्यांनी थोडी मदत केली, आमच्या सरकारने मागील 4 महिन्यांपासून दुधाच्या प्रश्नात लक्ष घातलंय : बाळासाहेब थोरा
- दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक, मंत्री, शेतकरी संघटना तसेच प्रशाकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे दूध दर वाढीचं आंदोलन केलं जात आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार पाषाण हृदयी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही आरोप केला. या आंदोलनात किसान सभेचे डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, सुरेश नवले आदी नेत्यांनी सहभाग घेतला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवरही दगडाला दुधाचा अभिषेक करुनही केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. भाजपच्या वतीने आज सकाळी 11 वाजता संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर देण्याची मागणी केली जाणार आहे. महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, सुरेश नवले यांच्या उपस्थिती आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर द्या
- केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा
- दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा
दरम्यान, महायुतीने देखील आज दुध प्रश्नावर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महायुतीकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलं जाणार आहे. महायुतीने राज्यव्यापी दुध संकलन बंद करण्याचाही इशारा दिला आहे. राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन संदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये निवेदन देणार आहेत.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामने देखील दूध वाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे. याविषयी विनायक मेटे म्हणाले, “दूध उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटरही दर मिळत नाही. कोणतीच संस्था हा दर देत नसून शेतकऱ्यांना केवळ 15 ते 20 रुपये मिळत आहे. त्यामुळे सरकारने दूध उत्पादकांना 10 रु प्रति लिटर अनुदान द्यावं. आजच्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन करु.”
हेही वाचा :
दुधाला 30 रुपये दर द्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महायुतीचे राज्यव्यापी आंदोलन
Strike Protest of Milk producer Farmer