3 विद्यार्थी 15 दिवसांपासून सरपटत शाळेत, अन्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट
नंदुरबार: गुजरात सीमेवरील एका गावातील शाळेत गेल्या 15 दिवसांपासून अजब प्रकार घडत आहे. तीन विद्यार्थी शाळेत सरपटत येतात आणि अचानक अंगात आल्यासारखं घुमू लागतात. याप्रकारामुळे आधी सर्वांना मस्करी वाटली, मात्र सलग 15 दिवसांपासून तीनही विद्यार्थी सरपटत येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावातील शाळेत हा प्रकार घडत […]
नंदुरबार: गुजरात सीमेवरील एका गावातील शाळेत गेल्या 15 दिवसांपासून अजब प्रकार घडत आहे. तीन विद्यार्थी शाळेत सरपटत येतात आणि अचानक अंगात आल्यासारखं घुमू लागतात. याप्रकारामुळे आधी सर्वांना मस्करी वाटली, मात्र सलग 15 दिवसांपासून तीनही विद्यार्थी सरपटत येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावातील शाळेत हा प्रकार घडत आहे.
तीन विद्यार्थी शाळेत आल्यावर घुमू लागतात. गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक चिंतातूर झाले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने याचा शाळेतील 150 विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. शाळेतील अजब प्रकार घडत असल्याने संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी काहीही उपाययोजना करण्यास तयार नाही.
डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावातील गुजरात जिल्हा परिषद शाळेची ही शाळा आहे. या शाळेतील इयत्ता सहावी आणि आठवीतील तीन विद्यार्थी सकाळी अकरा वाजता शाळेत आल्यावर विचित्र हालचाली करु लागतात. आश्विन, सुमित आणि राहूल अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे तीन विद्यार्थी जमीनीवर झोपून सापासारखे सरकत वर्गात प्रवेश करतात, त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिन्ही विद्यार्थी सतत दोन तासांपर्यंत विचित्र हालचाली करतात. या सर्वप्रकरामुळे अन्य विद्यार्थी मात्र घाबरले आहेत.
दरम्यान, हे विद्यार्थी असं का करतात याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
VIDEO: