कुणी शिक्षक देतं का शिक्षक? विद्यार्थी विणवण्या करत राहिले, शिक्षणाधिकारी पळून गेले?

शाळेमध्ये शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेला धडक दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयापुढे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शाळा सुरू होऊन आठ दिवसही झालेले नसताना शिक्षणाचे हे भयाण वास्तव विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणले.

कुणी शिक्षक देतं का शिक्षक? विद्यार्थी विणवण्या करत राहिले, शिक्षणाधिकारी पळून गेले?
कुणी शिक्षक देतं का शिक्षक? विद्यार्थी विणवण्या करत राहिले, शिक्षणाधिकारी पळून गेले?
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 7:48 PM

महाराष्ट्रात शिक्षण विभागात काय सुरु आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर खरंच खूप बरं होईल. एकीकडे डीएड, बीएड झालेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही आणि दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक दिसत नाहीत. इथे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण झालाय. शाळेत शिक्षक नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज चक्क जिल्हा परिषदेवर धडक दिली. कुणी शिक्षक देतं का शिक्षक? अशी म्हणण्याची नामुष्की या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर ओढावली. विशेष म्हणजे सांगलीत एका शाळेत पोषण आहारात मेलेल्या सापाचं पिल्लू आढळल्याची बातमी ताजी असताना इकडे चंद्रपुरात शाळांमध्ये मुलांना शिकवायला शिक्षक नसल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी जेव्हा जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलन केलं तेव्हा त्यांची भेट घ्यायला आलेल्या शिक्षणाधिकारी जास्त काळ न थांबता तिथून निघून गेल्या. यावरुन या शिक्षणाधिकाऱ्यांनी पलायन केलं, असा आरोप केला जातोय.

शाळेमध्ये शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेला धडक दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयापुढे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शाळा सुरू होऊन आठ दिवसही झालेले नसताना शिक्षणाचे हे भयाण वास्तव विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणले. या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे आल्या. पण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी व्यथा मांडताच त्यांनी तिथून अक्षरशः पलायन केले. महिला पालकांनी त्यांना आवाज देत पाठलाग केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवले.

आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही का? चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सवाल

संतप्त विद्यार्थ्यांना समजावण्याऐवजी, त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी खुद्द शिक्षणाधिकारीच चर्चेपासून पळ काढतानाचे चित्र बघायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा वणवा आहे. अशा शाळांतील हे विद्यार्थी आज एकत्रितपणे पालकांसह इथे आंदोलन करत आहेत. नवेगाव मोरे, चक निंबाला, विसापूर इत्यादी गावांमधून हे विद्यार्थी आले होते. विशेष म्हणजे शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे. पण आम्हाला या अधिकारापासून का वंचित ठेवत आहेत? असा सवाल आंदोलनासाठी आलेल्या चिमुकल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी केला.

शिक्षकांची पूर्तता करा, अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या आक्रमक आणि अचानक झालेल्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी या मुलांना आश्वस्थ करण्यास अपयशी ठरले. उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Non Stop LIVE Update
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.