100 कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची CID चौकशी करा- मुनगंटीवार

100 कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची CID चौकशी करा अशी मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

100 कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची CID चौकशी करा- मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:29 PM

चंद्रपूर : शहरालगत वनविभागाच्या महत्वाकांक्षी बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या आगीत संशोधन केंद्राचं मोठं नुकसान झालं आहे. चिचपल्ली गावाजवळ हे जागतिक दर्जाचं निर्माणाधिन बांबू संशोधन केंद्र आहे. या 100 कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची CID चौकशी करा अशी मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ही आग इतकी मोठी होती की आकाशात धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते.(Sudhir Mungantiwar demands CID probe into Chandrapur bamboo research center fire)

आग लागली त्यावेळी सुरुवातीला प्रकल्पाच्या छतावर आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळाले. त्यानंतर संपूर्ण छत आगीनं वेढलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. हा जागतिक किर्तीचा प्रकल्प सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रिम प्रोजेक्ट होता. जिल्हा, राज्य आणि देशातील वनांवर अर्थकारण असलेल्या ग्रामीण भागातील युवक-युवतींना हक्काचा रोजगार या केंद्राने मिळणार होता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची राख म्हणजे जिल्ह्याचे मोठे नुकसान अशल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

अवघ्या 6 महिन्यात लोकार्पण होऊ घातलेल्या देखण्या संकुलाची आग नैसर्गिक की घातपात याची चौकशी करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. ही आग नैसर्गिक असेल तर खबरदारीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? याचा तपास आवश्यक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची CID चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, चिचपल्ली इथल्या बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आक कशामुळे लागली आणि सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या, यासह अन्य बाबींची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आगीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली.

आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जवळपास 9 ते 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

‘तनपुरे साहेब, आता तरी भरती करा’, ‘तुमच्यासाठी खरंच लढतोय जरा धीर धरा!’

ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Sudhir Mungantiwar demands CID probe into Chandrapur bamboo research center fire

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.