AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

नागपूरमध्ये घरगुती वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली (Suicide due to Lockdown electricity bill).

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या
| Updated on: Aug 10, 2020 | 2:48 PM
Share

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वीज बिलांचा राज्यभरात अनेक नागरिकांना फटका बसला. ते बिल कमी करण्यासाठी अनेक नागरिकांना वीज महामंडळाच्या कार्यालयाच्या (एमएससीबी) खेटाही माराव्या लागल्या. मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Suicide due to Lockdown electricity bill).

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

लॉकडाऊनमध्ये आर्थिक उत्पन्नाची साधनं बंद झाली. त्यातच घरगुती वापराचं वीज बिल थेट 40 हजार रुपये आल्याने गायधने यांना धक्का बसला. त्यांच्या घरात कोणत्याही सामान्य घरात असावे इतकेच बल्ब आणि फॅन आहेत. मात्र, त्याचं बिल थेट 40 हजार आल्याने लीलाधर गायधने बरेच दिवस तणावात होते.

गायधने यांनी हे वीज बिल कमी करण्यासाठी वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटेही मारले. मात्र, तेथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट बिल न भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात तयार झाली. अखेर त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबाने दिली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

गायधने कुटुंबाने सांगितलं, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराचं वीज बिल 40 हजार रुपये आलं. इतकं बिल भरणं आम्हाला शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही हे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळाने घरातील वीजही खंडीत होण्याची भिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.”

या घटनेची यशोधानगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..

Asha Bhosle | आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, ‘महावितरण’चे उत्तर…

मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

Suicide due to Lockdown electricity bill

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.