AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय घडामोड घडण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती अशी विनंती, म्हणाल्या…

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. राजकारणात चाणक्य म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनाच पुतण्या अजित पवार यांनी दणका दिला आहे. राजकीय घडामोडीपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

राजकीय घडामोड घडण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती अशी विनंती, म्हणाल्या...
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटलांना काय म्हणाल्या होत्या? वाचा
| Updated on: Jul 02, 2023 | 6:32 PM
Share

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांना दुसऱ्यांदा आश्चर्याचा धक्का दिला आहे. यावेळी पहाटेचा मुहूर्ताऐवजी दुपारची वेळ साधली. भाजपा शिवसेना युतीसोबत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र ते वारंवार या गोष्टीला नकार देत होते. मात्र पक्षातून बाजूला सावरल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर वारंवार दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध फुटला असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राजकारणातील सर्वात मोठी घडामोड असल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे, राजकीय घडामोडी घडत असताना सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटलील यांना केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे

बारामतीच्या प्रश्नासाठी त्यांनी थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना विनंती केली आहे. त्याचं ट्वीट सध्या चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्याची दूरवस्था झाल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे सांगितले आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे त्यांनी यासाठी विनंती केली आहे. आता हे ट्वीट व्हायरल होत असून लोकं त्याखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

“बारामती लोकसभा मतदारसंघातील कापूरहोळ-नारायणपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना अक्षरशः कसरत करावी लागते. स्थानिक नागरिकांसह नारायणपूर येथील दत्त मंदिर आणि केतकावळे येथील बालाजी मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे. पुण्याचे पालकमंत्री यात लक्ष घालून या रस्त्याची डागडुजी दुरुस्ती करण्याचे आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

मंत्रिपदाची शपथ कोणी घेतली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.