Disha Salian Case: दिशा सानियन मृत्यू प्रकरण पुन्हा कोर्टात, सुशांतला मिळणार न्याय? वडील म्हणाले…
Disha Salian Case: दिशा सानियलच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागल्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या हत्येचा होणार उलगडा? काय आहे दोघांच्या मृत्यूचं कनेक्शन? अभिनेत्याचे वडील म्हणाले..., सध्या सर्वत्र दिशाच्या मृत्यूची चर्चा...

Disha Salian Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत दिशाच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केलाय. ‘माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या हत्या करण्यात आली आहे…’ यासाठी दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहे. दिशाच्या मृत्यूच्या 5 वर्षांनंतर तिच्या वडिलांनी पुन्हा मृत्यूचे दरवाजे ठोठावले आहेत.
दिशाच्या वडिलांनी लेकीच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा केल्यानंतर, सुशांतच्या वडिलांनी देखील मोठा दावा केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर सुशांतच्या मृत्यूचा देखील उलगडा होईल अशी आशा अभिनेत्याच्या वडिलांना आहे.




काय म्हणाले सुशांत सिंग राजपूतचे वडील?
दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सुशांत सिंह राजपूत याचे वडील म्हणाले. ‘दिशाच्या मृत्यू प्रकरणी पूर्वी तिच्या वडिलांना काहीही माहिती नव्हतं. तिची आत्महत्या असावी… असं ते म्हणत होते. ही आत्महत्या नसून हत्या आहे, असे नंतर ते कोणत्या आधारावर सांगत आहेत, मला कळत नाही.
#WATCH पटना: दिशा सालियान मामले पर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत के पिता ने कहा, “पहले दिशा सालियान के पिता ने कहा था वे कुछ नहीं जानते हैं आत्महत्या ही होगी। बाद में किस बात पर वे कह रह हे हैं कि ये आत्महत्या नहीं हत्या है ये मुझे नहीं पता… उन्होंने जो किया है ठीक किया है।… pic.twitter.com/CJ0YI5Fv9J
— ANI_HindiNews (@AHindinews) March 20, 2025
पण त्यांनी जे काही केलं ते योग्यच आहे. यामुळे सुशांतच्या हत्या प्रकरणी काय झालं हेही स्पष्ट होईल. पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात फरक आहे. सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पातळीवर जे काही करतील ते योग्यच असेल.’ असं देखील सुशांतचे वडील म्हणाले आहेत.
दरम्यान, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सांगायचं झालं तर, दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तर, या घटनेच्या 6 दिवसांनी, 14 जून 2020 रोजी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. पण दोघांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.