सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी कोणी आणि का केली ?
पुणे येथील संजीवनी हिंगोलीकर या वारकरी कीर्तनकार असून यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारे यांना समज द्या अशी मागणी देखील केली आहे.
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षरशः रान पेटवले आहे. जोरदार टीका करत सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवलेली असतांना आता सुषमा अंधारे याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी एका भाषणात संताच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप वारकरी करू लागले आहे. सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना समज द्यावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायातून होऊ लागली आहे. वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी याबाबत मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप आहे. सुषमा अंधारे राजकिय फायद्यासाठी संताचा अपप्रचार करणं बंद करा, अशी सर्व संतांची आणि वारकरी संप्रदायाची मागणी असून तात्काळ माफी मागा, असं वारकरी कीर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी केली आहे.
रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुटं शिकवलं असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.
पुणे येथील संजीवनी हिंगोलीकर या वारकरी कीर्तनकार यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारे यांना समज द्या अशी मागणी देखील केली आहे.
याशिवाय सुषमा अंधारे यांनी राजकीय फायद्यासाठी संताच्या बाबत केलेले विधान चीड आणणारे असून त्यांनी तात्काळ माफी मागावी असेही संजीवनी हिंगोलीकर यांनी केली आहे.
याशिवाय पैठणच्या सभेमध्ये केलेल्या भाषणादरम्यान एकनाथ महाराज यांच्याबाबत संदर्भ देत असतांना त्यांनी तो नामदेव महाराज यांचा असल्याचे सांगत चुकीची माहिती दिल्याचाही आरोप होत आहे.
एकूणच यावर सुषमा अंधारे यांची काय भूमिका असणार ? सुषमा अंधारे याबाबत माफी मागतात का ? उद्धव ठाकरे सुषमा अंधारे यांना समज देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.