AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलढाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याची हत्या? तीन संशयित ताब्यात

बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा त्याच्याच गाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

बुलढाण्यातील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याची हत्या? तीन संशयित ताब्यात
crime news
| Updated on: Mar 30, 2025 | 6:22 PM
Share

बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, स्वतःच्याच स्विफ्ट गाडीत पोलिसाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.   देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावर असलेल्या आर जे इंटरनॅशनल स्कूल जवळील वनविभागाच्या जागेत हा प्रकार घडला आहे. ज्ञानेश्वर मस्के वय 35 वर्ष असं  या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ज्ञानेश्वर मस्के हे  गिरोली खुर्द गावचे रहिवासी असून, ते सध्या  जालना जिल्ह्यातील हायवे पोलिसात कार्यरत होते. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. त्यांची गळा आवळून हत्या केली असावी असा अंदाज होता.  या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर मस्के यांचा त्यांच्याच गाडीमध्ये गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पथक आणि गुन्हे शाखेकडून पंचनामा करण्यात आला. मस्के यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानं आता पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

म्हस्के यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीमध्ये आढळला. ही गाडी एका झाडाला पार्क करण्यात आली होती. मस्के यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असा बनाव आरोपींना करायचा होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली असून, तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. मस्के हे ही घटना घडण्यापूर्वी आपल्या घरी देखील आले होते, त्यानंतर त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज आहे, या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह गाडीत आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.