Cyclone Tauktae Tracker and Updates : रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात वीजपुरवठा खंडित
अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ (Tauktae Cyclone) अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
भारतीय नौदलाच्या पथकाकडून केरळमध्ये मदतकार्य सुरू
दक्षिण नौदल कमांडच्या भारतीय नौदलाच्या मदत पथकाने शनिवारी राज्याच्या चेल्लनम किनाऱ्यावर चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या भागात बचाव मोहीम राबवली. यावेळी, दक्षिणेत नौदल कमांडच्या तीन नेव्हल डायव्हर्स आणि क्विक रिस्पॉन्स टीमने चेल्लनममधील मालाघपडी, कंपनीपाडी आणि मारुवाकड या गावात पूरग्रस्तांना मदत पुरवण्याचे काम केले.
-
भाजप अध्यक्ष मदत व बचाव कार्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी दुपारी 12 वाजता मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेणार आहे. भाजप खासदार, आमदार आणि बाधित भागातील पदाधिकाऱ्यांसोबत खबरदारी आणि मदतकार्याबाबत चर्चा करेन..
-
-
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
चक्रीवादळाच्या परिणामाला सुरुवात
दक्षिण रत्नागिरी परिसराला पावसाने झोडपलं
अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
-
केरळात एर्नाकुलम, त्रिशूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
केरळमधील एर्नाकुलम, त्रिशूर, इडुक्की आणि पलक्कड या जिल्ह्यांमध्ये 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
Tauktae Cyclone live Maharashtra : वादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, हवामान विभागाची माहिती
तौक्ते चक्रीवादळ सध्या गोवा किनारपट्टीपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे
तिथून ईशान्येला गुजरातच्या दिशेने वळेल
पण कोकण किनारपट्टीच्या भागात इम्पॅक्ट जाणवेल, पाऊस पडेल
18 तारखेला हे वादळ गुजरातमध्ये पोरबंदर भागात धडकेल
-
-
तौक्ते चक्रीवादळासंबंधी गावोगाव जनजागृती
चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती, बाणकोट, मंडणगड, महाराष्ट्र राज्यात शासनाची अत्यंत जय्यत तयारी, हवामान विभागाच्या होसाळीकरांकडून ट्वीट करत कौतुक
चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती, बाणकोट, मंडणगड, महाराष्ट्र राज्य. अत्यंत जय्यत तयारी शासनाची सर्व कोकण परीसरात व इतर भागांत. छान. मुंबईत व परीसरात पण सर्व तयारी. पुढचे 2 दिवस महत्वाचे. कृपया काळजी घ्या Announcement at Bankot, Mandangad.@CMOMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/le3p8BkuAS
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021
-
Tauktae Cyclone live Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या धावत्या भेटीवर मच्छीमारांची नाराजी
सिंधुदुर्ग-
तौक्ते चक्रीवादळाच्या पाश्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या धावत्या भेटीवर मच्छीमारांची नाराजी
मागील फयान, कॅर आणि निसर्ग चक्रीवादळात झालेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही
ती कधी मिळणार, धुप प्रतिबंधक बंधारा कधी पूर्ण होणार, मच्छीमारांची जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती
मात्र जिल्ह्याधीकाऱ्यांनी मच्छीमारांचं कोणतंच म्हणनं ऐकून न घेता तीथून घेतला काढता पाय
मच्छीमार झाले आक्रमक झाले
जिल्हाधिकाऱ्यांनी अशा ऐन वेळेला दौरे करुन काय साध्य होणार, मच्छीमारांचा सवाल
-
Tauktae Cyclone live Kerala : एर्नाकुलम आणि त्रिशूरसह अनेक जिल्हे रेड अलर्टवर
एर्नाकुलम, त्रिशूर, इडुक्की आणि पलक्कडला 20 सेमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता, त्यामुळे या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे
-
तौत्के चक्रीवादळ येत्या 6 तासांत गंभीर चक्रीवादळाचं रुप धारण करणार
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 6 तासांत तौत्के चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळ आणि पुढील 12 तासांत अत्यंत तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे
-
Tauktae Cyclone live Raigad : अलिबागच्या समुद्रात अद्यापही मच्छीमारांच्या 15 बोटी
रायगड चक्रीवादळ अलर्ट
मच्छीमारांच्या 15 बोटी अद्यापही समुद्रात, अलिबाग लगतच्या समुद्रात 15 बोटी असुन सध्यांकाळ पर्यंत किनाऱ्यावर येण्याची शक्यता
कालपासून सर्व बोटींना माघारी बोलवण्यात आले आहे
समुद्र किनाऱ्या लगतच्या सर्व तालुक्याच्या तहसिलदारांना आपात्कालीन परिस्थीतीमध्ये हलविण्यात येणाऱ्या गावांचा आढावा घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत
NDRF ला अलर्ट मोड देण्यात आला आहे
किनाऱ्या लगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे
-
Tauktae Cyclone live Sindhudurg : ‘तोक्ते’ चक्रिवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर प्रभाव
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘तोक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे
कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे
त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे त्याचं पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे
पहाटे झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे वेंगुर्ल्यात अनेक ठीकाणी झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान देखील झालं आहे
-
Tauktae Cyclone live Mumbai : वांद्रे-वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद – महापौर किशोरी पेडणेकर
आपत्कालीन बचाव इत्यादीसाठी सुमारे 100 लाईफगार्ड्स विविध समुद्रकिनार्यावर तैनात करण्यात आले आहेत
अग्निशामक दलाचे जवानही सज्ज आहेत
आज आणि उद्या वाहतुकीसाठी वांद्रे-वरळी सी लिंक बंद राहील
– मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
Deep Depression intensified into a Cyclonic Storm “Tauktae” (pronounced as Tau’Te) over Lakshadweep area and adjoining southeast & eastcentral Arabian Sea: Cyclone watch for south Gujarat & Diu coasts.* pic.twitter.com/cZ0lKGQKcV
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 15, 2021
-
चक्रीवादळाच्या परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – कृषिमंत्री दादा भुसे
मालेगाव –
चक्रीवादळासंदर्भात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याने कृषी विभाग अलर्ट झालं असून शेतकऱ्यांनाही सावधानतेचा इशारा दिला होता, वादळाची तीव्रता किती आहे, किती नुकसान होतं याकडे कृषी विभागाचे लक्ष असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे
– कृषिमंत्री दादा भुसे
-
Tauktae Cyclone live Kolhapur : इचलकरंजी शहरामध्ये पावसाची हजेरी शहरामध्ये पावसाच्या सरी बरसत आहे
इचलकरंजी –
इचलकरंजी शहरामध्ये पावसाची हजेरी शहरामध्ये पावसाच्या सरी बरसत आहे
शहरामध्ये हवेमध्ये चांगला गारवा निर्माण झाला आहे वारे सुटले आहे
अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ शहरांमध्ये दिवसभर मळाबाचे वातावरण आहे
-
Tauktae Cyclone live Sindhudurg | तौक्ते चक्रीवादळ 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल – हवामान विभाग
शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, हवामान विभाग –
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे
हे वादळ गोव्याच्या ३५० किलोमिटर दुर आहे, २४ तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल
सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग रत्नागिरीला जाणवेल
१६ तारखेला रायगड मुंबई पालघर याठिकाणी परिणाम जाणवेल
१८ तारखेला हे वादळ विरारळ जवळ प्रवास करणार
६० ते ७० प्रति किलोमीटर वाऱ्याच्या गतीमुळे झाडे आणि कच्च्या घराची पडझड होईल
-
Tauktae Cyclone live Pune | महाराष्ट्राला वादळाचा धोका कमी असला तरी मावळमधील एनडीआरएफची टीम संभाव्य धोका लक्षात घेवुन सज्ज झालंय
पुणे –
महाराष्ट्राला वादळाचा धोका कमी असला तरी मावळमधील एनडीआरएफची टीम संभाव्य धोका लक्षात घेवुन सज्ज झालंय
गोव्याला एक टीम रात्रीच रवाना झालीय तर अजून ही 13 टीम सज्ज आहेत
मुंबई, कोकण मधल्या प्रशासनाशी एनडीआरएफ संपर्क ठेवून आहे
आदेश मिळताच टीम रवाना होतील असं स्पष्ट करण्यात आलंय
-
Tauktae Cyclone live Kerala | केरळ आणि तामिळनाडूमध्ये तीव्र पूर परिस्थितीचा अंदाज
केरळ आणि तामिळनाडूमध्ये तीव्र पूर परिस्थितीचा अंदाज
चक्रीवादळ भारतीय पश्चिम किनाऱ्याजवळ आहे
केरळ, तामिळनाडूमध्ये तीव्र पूर परिस्थितीचा अंदाज वर्तविला जात आहे
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) शनिवारी केरळ आणि तामिळनाडूसाठी ‘ऑरेंज बुलेटिन’ जारी केला
या दोन्ही राज्यांमधील पूर पूरस्थितीचा अंदाज आहे
पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे
केरळ आणि तामिळनाडूच्या नद्या सध्या गंभीर स्थितीत वाहात आहेत
-
पंतप्रधान मोदी सायंकाळी पाच वाजता चक्रीवादळासंबंधी बैठक घेतील
पंतप्रधान मोदी सायंकाळी पाच वाजता चक्रीवादळासंबंधी बैठक घेतील
या बैठकीत पंतप्रधानांचे प्रधान सचिव, एनडीआरएफ, एनडीएमए आणि एसडीएमएचे अधिकारी उपस्थित असतील
-
Tauktae Cyclone live Sindhudurg | तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार नौकांनी घेतला देवगड बंदराचा आश्रय
सिंधुदुर्ग –
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार नौकांनी घेतला देवगड बंदराचा आश्रय
देवगड बंदर नौकांनी फुलून गेले, देवगड बंदर सर्वात सुरक्षित मानलं जातं
ज्या ज्या वेळी अशी स्थिती उदभवण्याची शक्यता असते त्यावेळी नेहमीच सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात
मात्र सध्यातरी फक्त कोकणातीलच बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे
बाहेरील नौकांना विजयदुर्ग बंदरात आश्रयासाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे
-
Tauktae Cyclone live Gujrat : गुजरात आणि केरळ येथील उड्डाणांवर चक्रीवादळाचा परिणाम
गुजरात आणि केरळ येथील उड्डाणांवर चक्रीवादळाचा परिणाम
इंडिगोनुसार, चक्रीवादळामुळे कन्नूर आणि कन्नूटला जाणाऱ्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे
त्याचबरोबर गुजरातहून विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
-
Tauktae Cyclone live Mumbai : मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर पालिकेने अलर्ट घोषित केला आहे
मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर पालिकेने अलर्ट घोषित केला आहे
पालिकेच्या 24 वार्डामधील नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत
समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यातील नागरिकांना गरज भासली तर इतरत्र हलवण्याची व्यवस्था करण्यात आली
पालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असणार आहे
-
Tauktae Cyclone live Gujrat | मुंडुली येथून पाच टीम गुजरातसाठी रवाना
मुंडुली येथून पाच टीम गुजरातसाठी रवाना झाल्या आहेत
चक्रीवादळ तौक्तेच्या पार्श्वभूमीवर थर्ड बटालियन मुंडुली, भुवनेश्वर येथून एनडीआरएफच्या पाच टीम आपातकालीन मदतकार्यासाठी गुजरातला जात आहेत
-
कार्यकर्त्यांनी गरजू लोकांची मदत करावी – राहुल गांधी
“केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळ चर्चेमुळे आधीच बर्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गरजू लोकांना सर्वतोपरी मदत देण्याचे आवाहन मी काँग्रेस कार्यकर्त्यांना करतो, कृपया सुरक्षित रहा”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं
#CycloneAlert has been issued in Kerala, Maharashtra, Goa, Tamil Nadu, Gujarat and Karnataka. Cyclone Tauktae is already causing heavy rains in many areas.
I appeal to Congress workers to provide all possible assistance to those in need.
Please stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 15, 2021
-
Tauktae Cyclone live Mumbai : मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत यंत्रणा सज्ज
– मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत यंत्रणा सज्ज
– मुंबईच्या जूहू बीच परिसरात लाईफ गार्ड आणि फायर ब्रिगेडला तैनात करण्यात आलंय
– मुंबईत सव्वा तीनला हायटाईड आहे, चार मिटरच्या लाटा ऊसळणार आहेत
– अरबी समुद्रात घोंघावणारे तौक्ते चक्री वादळ सक्रीय झाले आहे, सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे
– 17 वर्षांत पहिल्यांदाच भारतात हे वादळ चार राज्य म्हणजे केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रच्या किनारपट्टीतून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे
– लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे
– येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे
– या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे
-
‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी
‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे
आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे.
-
Tauktae Cyclone Update Sindhudurg : ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर प्रभाव
सिंधुदुर्ग –
‘तोक्ते’ चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर प्रभाव
जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा
पहाटे झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे वेंगुर्ल्यात अनेक ठीकाणी झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान
-
Tauktae Cyclone live Goa : मडगाव, कुडचेडे, केपे, सांगे येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे
मडगाव, कुडचेडे, केपे, सांगे येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे
उत्तर गोव्यात म्हापसा डिचोली इथे पाऊस पडला
मान्सून प्रवाह सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे
Goa radar observing the CS Tautkae 24×07 in west coast as part of radar network. Presently the CS is around 350 km SSW of Panjim Goa as per the last IMD bulletin. IMD pic.twitter.com/24QotqfX25
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021
-
Tauktae Cyclone live Mumbai : मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर पालिकेने अलर्ट घोषित केलं आहे
मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर पालिकेने अलर्ट घोषित केल आहे
पालिकेच्या 24 word मधील नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आला आहे
समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाडयातील नागरिकांना गरज भासली तर इतरत्र हलवण्याची व्यवस्था करण्यात आली
पालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असणार आहे
-
Tauktae Cyclone live Keral : केरळात शनिवारी मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर, कासारगोड आणि केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये रेड अलर्ट
केरळात शनिवारी मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर, कासारगोड आणि केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये रेड अलर्ट (20 सेमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस) जारी करण्यात आला आहे
कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर या सात जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट (११-२० सेमीपेक्षा जास्त पाऊस) जारी करण्यात आला आहे
किनारपट्टीचे भाग गेल्या तीन दिवसांपासून खराब हवामानाचा त्रास सहन करीत होते, कारण कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम किनाऱ्यावरील नैराश्यात बदलले होते
-
Tauktae Cyclone live Keral : केरळमधील 5 जिल्ह्यात रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता
तौक्ते रुपांतर तीव्र चक्रवादात होईल
केरळमधील 5 जिल्ह्यात रेड अलर्ट
मुसळधार पावसाची शक्यता
-
Tauktae Cyclone live Goa : गोवा राज्याला तौऊते वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता
गोवा राज्याला तौऊते वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता.
आज उद्या मूसळधार पाऊस हवामान शाळेचा अंदाज
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे रूपांतर तौऊते चक्री वादळात होण्याची शक्यता आहे.
लक्षद्विप मध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ईशान्येकडे सरकत आहे. 12 तासांत चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता.
18 तारखेपर्यंत वादळ गुजरात मध्ये धडकेल.
मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा
समुद्रात वारे तशी 70 ते 80 किलोमीटर आणि प्रसंगी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वाहतील तर किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर असेल.
समुद्र खवळलेला असणार आहे.
-
किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवा, विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या
विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे
मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
-
पालघर जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण
पालघर
पालघर जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे तौत्के चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा
-
गुजरातमध्ये प्रशासन सज्ज
गुजरात मध्ये प्रशासन सज्जतौऊते चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर प्रशासन सज्ज
गुजरातमधील देवभुमी, द्वारका, भावनगर आणि अमरेली मध्ये समुद्रकिनाऱ्यावर प्रशासन सज्ज
-
Tauktae Cyclone live Konkan : कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी, आज आणि उद्या रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात आँरेज झोन जारी
तौक्ते चक्रीवादळाचा रोख गुजराथच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते
लक्षद्विपजवळ कमी दाबाच्या पट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले
येत्या 12 तासात चक्रीवादळ अधीक सक्रीय होणार आहे
कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी, आज आणि उद्या रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात आँरेज झोन जारी
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा,
चक्रीवादळ कोकण किनारपट्टीजवळून पुढे सरकणार असल्याने किनारपट्टी भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात
मच्छिमारीला ब्रेक लागलाय
किनारपट्टी भागातलतच्या पाच किलोमिटर परिसरात प्रशासनाकडून दवंडी देऊन नागरिकांना सतर्क केले जाते
Update @8am@MahaDGIPR @Indiametdept @IMDWeather @DMRatnagiri @RatnagiriPolice @DDSahyadri @AirRatnagiri @akashwanimumbai @MiLOKMAT pic.twitter.com/9cnsjyqNmt
— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) May 15, 2021
-
Tauktae Cyclone live Aurangabad : औरंगाबादेत तुरळक पाऊस
औरंगाबाद शहरात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे
‘तौत्के’ चक्रीवादळाचा औरंगाबादलाही फटका बसला आहे
त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत
पुढील तीन ते चार दिवस अशाचप्रकारे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
-
Tauktae Cyclone live Mumbai : मुंबईतील स्थिती काय?
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या
सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे
त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे
मुंबईत काल रात्रीपासून प्रचंड गार वारा सुटला होता
त्यानंतर पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या
सद्यस्थितीत मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत
-
चक्रीवादळाचे राज्यावर काय परिणाम होणार?
चक्रीवादळाचे परिणाम
मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी
कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा
रायगड – मोठा पाऊस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट
-
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, घाट विभागात मुसळधार पाऊस
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल
घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल
-
चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
तर 14 मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल
तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल
तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल
तर 15 मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे
तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील
मुसळधार पावसाचीही शक्यता आहे
या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील, वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.
-
पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण
पुणे
पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण
शहरासह उपनगरात पावसाची शक्यता
-
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना चक्रीवादळाचा ईशारा दिला
रायगड अपडेट
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना चक्रीवादळाचा ईशारा दिला आहे
मच्छीमारांना व ईतर कोणलाही समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या आहेत
किनारपट्टी लगतच्या गावांना सतर्केतेचा ईशारा देऊन प्रशासनाला आपात्कालीन परिस्थीती मध्ये सतंर्क राहण्याचा ईशारा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील सपंर्क नबंरवर तात्काळ माहीती देण्याचे आवाहन केले आहे
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री हलकासा पाऊस पडला
परंतु पहाटे पासुन ढगाळ वातावरण
-
तौत्के चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे
तौत्के चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे
सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे
अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे
तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे
Very nice… https://t.co/NrobeJNiAl
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
-
कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे
लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे
त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे
या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे
तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.
-
महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
– महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
– मुंबईत आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालंय…
– मुंबईच्या बीकेसी परिसरात पावसापुर्वीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय…काही ठिकाणी हलक्या सरीही केसळल्या आहेत…
– येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
– अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल.
– हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल
– त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल
Deep Depression intensified into a Cyclonic Storm “Tauktae” (pronounced as Tau’Te) over Lakshadweep area and adjoining southeast & eastcentral Arabian Sea: Cyclone watch for south Gujarat & Diu coasts.* pic.twitter.com/cZ0lKGQKcV
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 15, 2021
Cyclonic Storm “Tauktae” latest updates from IMD pic.twitter.com/FwGeMNbQtz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
-
मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी
अरबी समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळ घोंघावत आहे
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सोसाट्याचा वारा सुटणार असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या
सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे
12.15 night The latest satellite IR images animation indicating that the deep depression system is quickly getting organized with spiral arms being seen getting formed. The deep depression is very likely to concentrate into Cyclonic Storm as per IMD forecast. Its getting ready ! pic.twitter.com/FIf8X9576y
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
-
रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी –
रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर ऑरेंज अलर्ट
समुद्रात पाण्याला करंट, चक्रीवादळाचे तीव्रता आज दुपारपासून वाढणार
जिल्ह्यात वाऱ्याचा वेग हि वाढला, 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
रायगड मुंबई ठाणे आणि पालघरात देखिल पावसाचा इशारा
कोविड सेंटरमध्ये जनरेटरची सुविधा करा प्रशासनाचे आदेश
-
तौक्ते चक्रीवादळाचा रोख गुजराथच्या दिशेने, लक्षद्विपजवळ कमी दाबाच्या पट्याचे रुपांतर चक्रीवादळात
रत्नागिरी –
तौक्ते चक्रीवादळाचा रोख गुजराथच्या दिशेने
लक्षद्विपजवळ कमी दाबाच्या पट्याचे रुपांतर चक्रीवादळात
येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार
कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी, आज आणि उद्या रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात आँरेज झोन जारी
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा,
चक्रीवादळ कोकण किनारपट्टीजवळून पुढे सरकणार
मच्छिमारीला ब्रेक, किनारपट्टी भागातलतच्या पाच किलोमिटर परिसरात प्रशासनाकडून दवंडी
कुणी समुद्राजवळ जावू नये प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
Published On - May 15,2021 10:03 PM