Cyclone Tauktae Tracker LIVE Updates | मुंबईमध्ये चक्रीवादळाचा धोका टळला, समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस
Tauktae Cyclone Latest LIVE Update | अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे.
Tauktae Cyclone Latest Update | अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईमध्ये चक्रीवादळाचा धोका टळला, समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस
मुंबई: मुंबईच्यामध्ये चक्रीवादळाचा धोका टळलेला आहे. मात्र, येथे वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्ली सी फेस परिसरातील समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. सोमवार मुंबईमध्ये 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
-
तौत्के चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीपासून 27O किमी लांब
हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, तौत्के चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून 270 किमी लांब आहे. तर गोव्यापासून 190 किमी, गुजरातच्या वेरावल किनारपट्टीपासून 510, दीवपासून 470 किमी, तर पाकिस्तानच्या कराचीपासून 700 किमी लांब आहे. हे वादळ 17 मे रोजी संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनाररपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 18 मेच्या सकाळी वादळ पोरबंदर आणि महुआ भागातून जाणार
-
-
मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात
मुंबई : मुंबईच्यामध्ये चक्रीवादळाचा धोका जरी टळलेली असला तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील वरळी सी फेस परिसरातील समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील अजूनही काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईत 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, अशी शक्यता वर्तवली आहे.
-
सिंधुदुर्गातील ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्या घराचं नुकसान
सिंधुदुर्गातील ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्या घराचं नुकसान बातमी कव्हर करण्यासाठी विनायक वंजारे आज फिल्डवर असताना समोर आली घटना
-
तौक्ते चक्रीवादळ पालघरच्या दिशेला, पहाटे पाच वाजता धडकण्याची शक्यता
पालघर : समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा धोका वाढायला सुरुवात झाली असून पालघरकडे वेगाने सरकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे वादळ पहाटे पालघर जिल्ह्याला पाच वाजेपर्यंत धडक देण्याची चिन्हं आहेत. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेनऊ वाजता आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक संपन्न झाली. पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रालगत असलेल्या नागरिकांना ज्या ठिकाणी प्रशासनाने आपत्कालीन राहण्याची व्यवस्था केली तिचा स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे प्राणी जनावर असतील त्यांना बांधून ठेवू नये, असं आवाहन करण्यात आला. प्रशासन वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाल आहे. नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे
-
-
चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला, दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत
रत्नागिरी :
चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला
दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत
रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल
काही ठिकाणी सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारपासून वीज खंडीत
-
रत्नागिरीला तौत्के वादळाचा फटका, 800 ते 1000 घरांची पडझड
रत्नागिरीला तौत्के वादळाचा फटका रत्नागिरी तालुक्याला वादळाचा फटका 104 गावांमधील 800 ते 1000 घरांची पडझड निसर्ग नंतर तौत्की वादळाने केलं नुकसान नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता रत्नागिरी, राजापूर सह बर्याचं ठिकाणचं वीजपुरवठा खंडीत
-
तौक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नुकसान
तौक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नुकसान
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत
मध्यरात्रीनंतर चक्रीवादळ जिल्हयाबाहेर पडण्याची शक्यता
-
तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरीपासून 142 किमी अंतरावर
तौक्ते चक्रीवादळ मार्गक्रमण
– रत्नागिरीपासून १४२ किमीवर (वाऱ्याचा वेग ४५ कि मी प्रति तास)
जयगडपासून (रत्नागिरी) १२६ किमीवर ( वाऱ्याचा वेग ४८ कि मी प्रति तास)
दाभोळपासून (गुहागर) ११८ किमीवर ( वाऱ्याचा वेग ५५ कि मी प्रति तास)
वेळासपासून (मंडणगड) १२० किमीवर ( वाऱ्याचा वेग ५५ कि मी प्रति तास)
-
रत्नागिरी : तौक्ते वादळाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीतील घरांना बसला
रत्नागिरी :
तौक्ते वादळाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीतील घरांना बसला
वाडीतील अनेक घरे बाधित, कौलारू घरांची छपरे उडाल्याने अनेकजणांची राहण्याची गैरसोय
संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील 14 कुटुंबे अतिबाधित झाल्यामुळे उपसरपंच संतोष येडगे यांनी सर्वांचे वाडीतील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर केले
-
महाराष्ट्राच्या समुद्र किनारी भागातील हजारो नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण
मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हयातील समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. प्रशासनाने रत्नागिरीतील 3896, सिंधुदुर्गमधील 144 आणि रायगडच्या 2500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
-
रायगडला जिल्ह्यासाठी उद्यासाठी रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगडला जिल्ह्यासाठी उद्यासाठी रेड अलर्ट अतिमुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरी, सिंधुदुर्, मुंबई, ठाणे, पालघरला आँरेज अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा
-
NDRF चे अनेक पथक गुजरातला रवाना, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
NDRF चे 100 पेक्षा जास्त पथक पाच ते सहा राज्यात तैनात करण्यात आले आहेत. यापैकी अर्ध्या पथकाना गुजरातच्या दिशेला रवाना करण्यात आलं आहे. तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीजवळ आहे. तिथे प्रचंड वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. हे चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीलगत पोहोचण्याचा अंदाज आहे. जसजसा वेळ जाईल तसतसं हे वादळ जास्त घातक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या वादळाचा गुजरातला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभीवर गुजरातच्या किनारपट्टी भागात तयारी सुरु आहे. किनारपट्टी भागातील अनेक लोकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. अजूनही हे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
चक्रवात तौकते का मुख्य प्रभाव गुजरात में रहेगा। हमने 100 से ज्यादा टीमों को 5-6 राज्यों में लगाया था। इन टीमों का आधा हिस्सा गुजरात में लगाया गया है क्योंकि चक्रवात तौकते का प्रभाव गुजरात में ज्यादा रहेगा: एस.एन. प्रधान, DG NDRF #cyclonetaukate https://t.co/UKjK3lCGlj
— ANI_HindiNews (@AHindinews) May 16, 2021
-
रात्री उशिरा चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार, किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू
रायगड :
रात्री उशिरा चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार
जिल्ह्यात किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्यातील 1600 नागरिकांचे स्थलांतर
शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी हलवले
जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता
जिल्हा प्रशासनाची माहिती
-
गोव्यात चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांचा मच्छीमारांना अलर्ट NDRF टीम विविध ठिकाणी काम करत आहे तौत्के वादळामुळे 2 जणांचा मृत्यू विजेचा खांब पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाडा पडल्यामुळे एकाचा मृत्यू
-
अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सज्ज
विरार: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सज्ज झाले आहे. सागरी पोलीस व तटरक्षक जवान तैनात झाले आहेत. मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटी समुद्र किनार्यावर पोहचल्या आहेत.
आज सकाळ पासूनच वसई-विरार नालासोपारा क्षेत्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या आवाहवानानुसार अनेक मच्छीमार बांधवानी आपल्या बोटी व अतिरिक्त जाळे, तसेच इतर सामुग्री किनारपट्टीवर सुखरूप बाहेर काढली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा फारसा फरक वसई विरार मधील समुद्र किनाऱ्यावर सध्या दिसून येत नाही, मात्र येथील प्रसशासन पूर्णता सज्ज झाले असून, खबरदारी पाळत असल्याचे दिसून येत.
-
परभणी जिल्ह्यातही वादळी वारा आणि पाऊस
अरबी समुद्रात सुरू असलेल्या तौक्ते वादळामुळे परभणी जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू असून, आज ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून परभणीत ढगाळ वातावरण होते. दुपारी 3 च्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दरम्यान पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गर्मीच्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर शेतातील काढणी केलेली हळद आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालीय तसेच भुईमूग काढणी खोळंबली आहेत.
-
महाराष्ट्र सरकारची तौत्के वादळासाठी तयारी, सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा
महाराष्ट्र सरकारची तौत्के वादळासाठी तयारी सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा रूग्णलयांचा विद्युत पुरवठा खंडीत न होण्यासाठी खबरदारी आँक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासनाची खबरदारी बँकअप यंत्रणा लगेच कार्यन्वित होईल रूग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही य़ासाठी तयारी जम्बो आणि इतर कोविड केंद्रातील रूग्णांची इतर ठिकाणी सोय आँक्सजन उप्पादन आणि वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्य़ाची तयारी कच्चा घरातील लोकांना इतर ठिकाणी स्थालतरिंत केलं मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आलं प्रत्येक जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाशी तयारी
-
गुजरातच्या महिसागर भागात पावसाला सुरुवात, चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता
तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून काही किमी अंतरावर आहे. गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. तिथे अनेक झाडं, विजेचे खांब उन्मळून पडल्याचा घटना समोर आल्या. दुसरीकडे महाराष्ट्रातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. तसेच रत्नागिरीतही समुद्र खवळला आहे. त्यापाठोपाठ आता या वादळाचा फटका गुजरातलाही बसण्याची शक्यता आहे. गुजरातच्या महिसागर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळथधार पावसाला सुरुवात झालीय. सुरक्षेच्या पार्भूमीवर पुण्यातील एनडीआरएफची टीम महुआ गावाच्या दिशेला निघाली आहे. हे वादळ 18 मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. गुजरातला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून 380 किमा तर गुजरातपासून 700 किमी लांब आहे.
-
रत्नागिरीत समुद्रा खवळला, 90 किमी प्रतितास वेगाने वारा, तौत्के गुजरातच्या दिशेला
तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे, समुद्राचं पाणी आता रस्त्यावर आलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी परिसरात 90 किमी प्रतितास वेगाने वारा वाहतोय. तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेला निघालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
-
गोव्यात तौत्की वादळामुळे विमानसेवा बंद
गोव्यातील तौत्की वादळामुळे विमानसेवा बंद सर्व कंपन्याची विमानसेवा बंद राहणार तौत्की वादळामुळे गोव्यात वादळी वार्यासह पावसाला सुरूवात अनेक ठिकाणी झाड आणि इलेट्रीक पोल कोसळले
-
रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा, मुसळधार पावसाची शक्यता
रायगड :
समुद्र किनाऱ्यावरील 62 गावे, तसेच खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा
उद्या सकाळपासून जोरदार पावसाची शक्यता
पुढील दोन दिवस जिल्ह्यातील लसीकरण बदं फक्त आत्यावश्यक वैद्यकिय सेवा सुरु राहील.
कच्चे घर आणि खराब स्लँब व भिंतीच्या घरात न राहता तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे.
आदिवसाई भागात किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना आदीवसी जनतेने सहकार्य करावं. जनतेने प्रशासनाला सहकार्य करीत जवळील शाळांमध्ये किवां शेल्टर होममध्ये आश्रय घ्यावा, प्रशासनाला सहकार्य करावे
रायगड जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
-
गोव्यावर चक्रीवादळाचा हाहा:कार, मुसळधार पाऊस, झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले
गोवा राज्य सध्या दुहेरी संकटातून जाताना दिसत आहे. एककीकडे गोव्यात कोरोना थैमान घालत असताना आता तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. काही ठिकाणी तर झाडे घरांवरच कोसळल्याने अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय समुद्र प्रचंड खवळलेला आहे
-
सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, चक्रीवादळाचा वेग वाढत जाण्याची शक्यता
सिंधुदुर्ग- हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग रेड अलर्ट
चक्रीवादळाचा वेग वाढत जाण्याची शक्यता
ताशी 150 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू
-
पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी 512 नौका समुद्रात, प्रशासनाच्या अलर्टनंतर समुद्रकिनारी परतल्या
जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल
पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून . पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी परत आल्या आहेत
-
अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने, किनारपट्टी भागात लाटांचे तांडव
रत्नागिरी- अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने
किनारपट्टी भागात लाटांचे तांडव
तीन ते साडेतीन मीटरच्या लाटा
40 ते 45 किलोमीटर वेगाने वाहतात वारे
थोड्याच वेळात राजापूर तालुक्यातील वादळाचा होणार प्रवेश
रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टी पासून दोनशे किलोमीटर वरती वादळ
रत्नागिरी आणि राजापूर मधल्या किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा
-
तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या मालवण किनारपट्टीवर दोन-तीन मीटरच्या लाटा, जिल्हा प्रशासन सतर्क
सिंधुदुर्ग:- तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या मालवण किनारपट्टीवर जोर
मालवणच्या किणा-यावर दोन ते तीन मिटरच्या लाटा
सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस
समुद्र खवळलेला असून समुद्राच्या आत धुक सदृष्य वातावरण जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील 68 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवलं
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन सतर्क
-
दुपारी 12 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगडमध्ये चक्रीवादळ दाखल होणार
चक्रीवादळ मालवण नजिकच्या समुद्रपर्यंत पुढे सरकले
साधारण दुपारी १२ वाजेपर्यंत याचा प्रवेश रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगडच्या जवळ होईल असा अंदाज आहे
-
तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून 130 किलोमीटर अंतरावर, जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड
Cyclone Tauktae VIDEO | तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून 130 किलोमीटर अंतरावर, जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड #Tauktae #CycloneTauktae #CycloneAlert #CycloneTauktaeupdate #cyclonetaukate #MumbaiRains #MumbaiRain pic.twitter.com/R2O7PhryLS
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2021
-
तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून 130 किलोमीटर अंतरावर, सिंधुदुर्गात पावसाला सुरूवात
– तौत्के वादळाची सध्याची स्थिती
-तौत्के चक्रीवादळ गोव्यापासून 130 किलोमीटर अंतरावर
– मुंबईपासून ४५० किलोमीटर अंतरावर वादळ
-सिंधुदुर्गात पावसाला सुरूवात
-
तौक्ते वादळचा प्रवास नेमका कसा?
कोकणात आज धडकणार चक्रीवादळ तौक्ते वादळ हे आज तीव्र होईल दोन दिवसात कोकण ,गोवा पार करुन मंगळवारी गुजरातच्या द्वारकेजवळ धडकेल
कशा असेल तौक्ते वादळ प्रवास 14 मे लक्षद्वीप निर्मिती 15 मे कोकण व गोवा किनारपट्टी प्रवास सुरु 16 मे चक्रीवादळात रुपांतर 17 मे मुंबईजवळून गुजरातच्या दिशेने जाणार कोकण व गोवा किनारपट्टीवर पहाटे 3ते 4 च्या दरम्यान येणार ( वेग ताशी 160 ते 170 किमी ) 18 मे राजकोटला पोहोचणार 19 मे राजस्थानमधून कराची मार्गे पाकिस्तानकडे जाणार
-
तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या जवळून जाणार, प्रशासनाकडून विशेष दक्षता
रायगड – अलिबाग
तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या जवळून जात असल्याचा हवामान खात्याने अंदाज
प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील मागच्या वर्षीच्या चक्रीवादळाचा अनुभव घेता मोठ्या प्रमाणात झाडे तुटून विज प्रवाह खंडीत होण्याची शक्यता
वीज वितरण यत्रंणाना जिल्ह्यातील रुग्णालये, ऑक्सिजन उत्पादन व रिफीलिगं कपंन्या करीता विशेष तैनात करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून आपत्कालीन यत्रंसामुग्री बाबत आढावा घेण्यात आला आहे.
तसेच जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते, रुग्णालय, तसेच आत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालय जवळील मोठ मोठाले झाड्याच्यां फाद्यां तुटून नुकसान होण्याची शक्यता
झाडे व फाद्यां कापण्याचे काम सुरु
-
कोल्हापूर जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका, शेतीची मोठे नुकसान, घरांची पडझड
कोल्हापूर –
इचलकरंजी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवू लागला आहे
शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतीची मोठे नुकसान
शहरांमध्ये वाऱ्याचे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही घरांची पडझड झाली आहे
-
नाशिक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नाशिक :
– चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आपत्कालीन विभाग ही अलर्ट – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना – तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याच केलं आवाहन – नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात रात्री पासून ढगाळ वातावरण
-
रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी, तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी : चक्रावादळाच्या संभाव्या धोक्यामुळे प्रशान अलर्ट आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी तर आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना अलर्ट
रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांंना सतर्कतेचा इशारा मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी
-
सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा
सिंधुदुर्ग :
तौक्ते वादळाचे जिल्ह्यात पडसाद.
पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा
रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गायब
तर किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस।
-
तौक्ते चक्रीवादळादरम्यान जोरदार पावसाची शक्यता, विविध रुग्णालयांतील रुग्णांचे सुरक्षितपणे स्थलांतर
कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर
अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळादरम्यान वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता
खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णालयांतील रुग्णांचे सुरक्षितपणे स्थलांतर
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड रुग्णालयातून रुग्णांना हलवले
तसेच दहिसर आणि मुलुंडच्या कोविड रुग्णालयातून ही रुग्णांना सुरक्षित स्थानिक हलविण्यात आलं.
बिकेसी , दहिसर आणि मुलूंड येथील भव्य कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील 243, दहिसर कोविड केंद्रातील 183 आणि मुलूंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश
-
मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, अनेक भागात पावसाच्या सरी
मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, अनेक भागात सोसाट्याचा वारा
काही भागात पावसाच्या सरी
मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित.
मुंबईतील काही भागांत पावसाची हजेरी
शहर व उपनगरात रिमझिम पाऊस
Published On - May 16,2021 11:09 PM