महाराष्ट्रातच्या राजकारणात चर्चा नव्या भिडूची, रविवारी नांदेडमध्ये भव्य सभा, काय आहेत के चंद्रशेखर राव यांचे डावपेच?

शिवसेना, भाजप, शिंदेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी,वंचित बहुजन आघाडी आदी प्रमुख पक्षांच्या स्पर्धेत आता नवा भिडू येऊ पाहतोय. काय आहेत या पक्षाची ध्येयधोरणं.. थोडक्यात पाहुयात.

महाराष्ट्रातच्या राजकारणात चर्चा नव्या भिडूची, रविवारी नांदेडमध्ये भव्य सभा, काय आहेत के चंद्रशेखर राव यांचे डावपेच?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 2:58 PM

राजीव गिरी, नांदेड : दोन महिन्यात दुसऱ्यांदा तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) उद्या रविवारी नांदेड (Nanded) दौऱ्यावर येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा इथल्या बैल बाजाराच्या मैदानात राव यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरातील कन्नडचे हर्षवर्धन जाधव, नांदेडचे यशपाल भिंगे यांचा नुकताच BRSमध्ये प्रवेश झालाय. आता उद्या रविवारच्या सभेत राज्यातील इतर पक्षातील नेते KCR यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार आहेत. या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली असून त्यासाठी मोठी बॅनर बाजी करण्यात आली आहे.

BRSचं नेमकं धोरण काय ?

तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी जन आंदोलन उभारणारे के चंद्रशेखर राव हे आंध्रप्रदेशमधले मातब्बर नेते आहेत. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तिथल्या नागरिकांनी तेलंगणा राष्ट्र समिती या चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला सत्ता सोपवली. दक्षिणेकडच्या राज्यात दोन वेळा बहुमत मिळवणारे नेते म्हणून त्यांची कारकीर्द उजळून निघालीय. या दरम्यान शेतकऱ्यांना मोफत चोवीस तास विद्युत पुरवठा, वार्षिक एकरी दहा हजारांची मदत आणि मुली आणि दलित अल्पसंख्याकासाठी कल्याणकारी योजना राबवल्यामुळे केसीआर लोकप्रिय झाले. त्यांच्या या योजनांची सीमावर्ती महाराष्ट्र राज्यातील जनतेला भुरळ पडली .

केसीआर यांनी तेलंगणा बाहेर आपला जम बसवण्यासाठी आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केलय. आणि आता ते तेलंगणाच्या बाहेर आपले नशीब आजमावत आहेत. अब की बार किसान सरकार असा नारा देत त्यांनी नांदेडकडे विशेष लक्ष दिलय. यापूर्वी पाच फेब्रुवारी रोजी केसीआर यांनी भव्य दिव्य नियोजन करत घेतलेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता ते पाहून केसीआर यांच्या अपेक्षा उंचावलेल्या दिसतायत. त्यामुळे ते पुन्हा नांदेड दौऱ्यावर येत आहेत.

टॉलीवुड स्टाईलची भुरळ

बीआरस या पक्षाचे निवडणूक चिन्ह कार आहे. या चिन्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक नव्या कोऱ्या गाड्या घेऊन बीआरसचे अनेक आमदार सध्या नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. या नव्या कोऱ्या गाड्या पाहून युवक मंडळी बीआरसच्या गळाला लागत आहेत. पण हे तात्पुरते आकर्षण पक्ष निष्ठेत बदलू शकेल का हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात नांदेडमध्ये सगळेच पक्ष सक्रिय आहेत. इतकंच काय तर नांदेडमध्ये शेकडोंच्या संख्येने संघटना आहेत. इतक्या भाऊगर्दीत बीआरसचा कितपत टिकाव लागेल अशी शंका सगळ्यांनाच आहे.

रविवारी BRSचा पक्ष प्रवेश सोहळा

लोहा इथे रविवारी होणाऱ्या बीआरएसच्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री KCRर यांच्या उपस्थितीत अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यात प्रामुख्याने दलित नेते सुरेश दादा गायकवाड, शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे, आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, यशपाल भिंगे आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. तसेच आणखीन काही नेत्यांना बीआरएसच्या नेत्यांनी गळ घातली, त्यामुळे आणखीन काही नाव आयत्या वेळी पक्ष प्रवेश करू शकतात.

निवडणुकीची प्रतीक्षा

आपल्या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी बीआरएसने पक्ष विस्तारासाठी नांदेड पासून सुरुवात केलीय. नांदेडमध्ये मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनेक नगरपालिकाच्या निवडणूका कोणत्याही क्षणी लागणार आहेत. या सगळ्याच निवडणूकांच्या मैदानात उतरून पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी ओळख निर्माण करून देण्याचा BRS च्या नेतृत्वाचा प्रयत्न आहे. मात्र सीमावर्ती भाग वगळता BRS ला कितपत मते मिळतात याबाबत साशंकता आहे. कारण महाराष्ट्रातील लोक सगळ्यांच्याच सभेला गर्दी करतात मात्र मतदान केंद्रात गेल्यावर कोणते बटन दाबतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे बीआरएसला आगामी काळात जम बसवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. केवळ तेलंगणात आम्ही हे केलं आणि ते केलं हे सांगून मराठी मत मिळवणं अवघड आहे असेच राजकीय चित्र सध्या दिसतय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.