राज्यातील १३ जिल्ह्यांत थंडीचा प्रकोप, ‘हॉट सीटी’चे तापमान सर्वात कमी

राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.७ अंश सेल्सियस होते. त्यानंतर निफाडचा क्रमांक आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ अंशावर आले आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यांत थंडीचा प्रकोप, 'हॉट सीटी'चे तापमान सर्वात कमी
राज्यातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. धुके निर्माण झाले आहे.Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 5:06 PM

मुंबई : Weather Alert : राज्यात थंडीचा कडका सुरु आहे. सर्वात हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमान सर्वाधिक घसरण झालीय. काश्मिरामध्ये सुरु असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

सोमवारी ९ जानेवारी महाराष्ट्रातील सुमारे १३ जिल्ह्यांतील किमान तापमानात ५ ते ६ अंशांची घट झालीय. राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.७ अंश सेल्सियस होते. त्यानंतर निफाडचा क्रमांक आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ अंशावर आले आहे. औरंगाबाद ५.७ अंश, उस्मानाबादचे तापमान ९ अंश सेल्सिय नोंदवण्यात आलेय. नाशिकमध्ये सकाळी नऊपर्यंत दाट धुक्याची चादर दिसून येतंय.

तापमान आणखी घसरणार पुढील ४८ तास म्हणजे मंगळवार व बुधवारीही किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे आयएमडीने म्हटलंय.

कुठे किती तापमान

ओझर ४.७ । निफाड ५.० । जळगाव ५.० । धुळे ५.० । गोंदिया ७.०

देशात थंडी वाढणार

उत्तर भारतातील काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच राजस्थानात चांगली थंडी आहे. तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरले आहे. त्याचा परिणाम रेल्वे व विमानसेवेवर होत आहे. IMD ने देशभरात पुढील तीन दिवस तापमानात घसरण कायम राहणार असल्याचं म्हटलंय. मध्य प्रदेशात तापमान दोन ते तीन डिग्री घसरणार आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगढमध्ये 8 शीतलहर कायम असणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तरी राजस्थान, बिहार, सिक्किम, त्रिपुरामध्ये आणखी तीन दिवस धुके कायम असणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.