AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात थंडीचा गारठा, राज्यातील या शहराचे तापमान 4.2 अंशावर, तापमान घसरण्याचे कारण काय?

Maharashtra Weather Update: उत्तर भारतातून येणारे थंड वारे नाशिक, विदर्भासह राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये येत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडी वाढली आहे. जम्मू काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे वातावरण बदलले आहे.

उन्हाळ्यात थंडीचा गारठा, राज्यातील या शहराचे तापमान 4.2 अंशावर, तापमान घसरण्याचे कारण काय?
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2025 | 10:21 AM

Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यात चांगलेच ऊन जाणवले. यंदा फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसला. यामुळे यावर्षी उन्हाळा तीव्र असणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु वातावरणातील विचित्र बदलाचा अनुभव नाशिककरांना आला. एका दिवसात 7 अंशांनी तापमान घसरले. निफाडमध्ये शीतलहरी वाहू लागला. बुधवारी रात्रभर तसेच गुरुवारी पहाटे थंडीचा निफाडमध्ये थंडीचा कडाका जाणवला. नाशिक जिल्ह्याचे तापमान घसरले. नाशिक शहरात 10 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 4.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.

किमान तापमान 4.2 °C वर

राज्यभरात सर्वत्र उन्हाच्या झळा बसत असताना आता नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा गारवा गुरुवारी जाणवायला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिक जिल्ह्यात असलेल्या निफाडमध्ये तापमान कमी झाले. यामुळे निफाडमध्ये पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. निफाडचे कमाल तापमान 31.3 °C तर किमान तापमान 4.2 °C वर पोहचले आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. राज्यभरात तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे.

बुधवारी निफाळमध्ये विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना आला. दिवसा उन्हाच्या झळांची तीव्रता होती. त्यानंतर कमाल तापमान दोन अंशांनी घसरले. मग किमान तापमानाचा पारा वेगाने खाली घसरला. पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना स्वेटर काढावे लागले.

हे सुद्धा वाचा

जळगाव जिल्ह्याचे कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 10० अंश सेल्सिअस एवढे आहे. जळगावात सकाळी आणि रात्री थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. जम्मू काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जळगावसह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला आहे.

मंगळवारी रात्री जळगावाचे किमान तापमान 17 अंशांवर होते. ते बुधवारी 10 अंशांपर्यंत घसरल्याने गारव्यासोबतच थंडीही जाणवत आहे. होळीनंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान 8 मार्चपर्यंत पहाटेचा गारवा अधिक राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

का बदलले तापमान?

उत्तर भारतातून येणारे थंड वारे नाशिक, विदर्भासह राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये येत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडी वाढली आहे. दीड महिन्यांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात पूर्वीय दिशने दमट आणि आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा एकसुरी वहनामुळे राज्यात झेपावणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येत होता. थंडीची लाट अजून एक-दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.