तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाची कारवाई, 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश
8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत तर इतर 16 पुजाऱ्यांना 6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
उस्मानाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन आणि गैरवर्तन केल्याने तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यावर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कारवाई केली आहे. 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत तर इतर 16 पुजाऱ्यांना 6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)
कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. पुजारी अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे व आकाश परदेशी या 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली असून 6 महिने मंदिर प्रवेश बंदी का वाढवू नये अशी नोटीस बजावली आहे.
मंदिरात पूजेची पाळी नसतानाही तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनापरवाना प्रवेश केल्या प्रकरणी 16 पुजाऱ्यांना 6 महिने मंदिर प्रवेश का करू नये अशी नोटीस बजावली असून यात सत्यजित कदम, विशाल सोंजी, शशिकांत पाटील, अक्षय कदम, अथर्व कदम, शशिकांत कदम- परमेश्वर, बुवासाहेब पाटील, सौरभ कदम- परमेश्वर, सुहास कदम, आकाश कदम, आनंद पाटील, नेताजी पाटील, विशाल पाटील, दिनेश परमेश्वर, सार्थक मलबा व सुहास कदम यांचा समावेश आहे.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही पुजारी मंडळाची बैठक संपन्न झाली. त्यात पुजाऱ्यांना मंदिराचे उत्तर बाजूकडील भवानी शंकर गेटद्वारे गाभाऱ्यात प्रवेश देण्याचे ठरले. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाकंभरी नवरात्र उत्सवात उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याचे बैठकीत ठरल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 13 जानेवारी पासून सुरु 23 जानेवारीपासून विविध अलंकार पूजा होणार आहेत. (Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)
आता महाराष्ट्रातही Sea Plane प्रवासाची संधी, मुंबई-शिर्डीसह ‘या’ मार्गावर लवकरच सेवा सुरु होणार
(Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)