Tet Exam scam : टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार सुपेच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड, आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, बंगळुरूमधून जी.ए टेक्नॉलॉजीचा संचालक प्रीतेश देशमुखसह बीडमधून संजय सानप या मुख्यसूत्रधारांना अटक करण्यात आलीय.

Tet Exam scam : टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार सुपेच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड, आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल
तुकाराम सुपे
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 11:11 PM

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार तुकाराम सुपेच्या घरातून दिवसेंदिवस कोट्यावधीची घबाड उघड होतायत. पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरी आणि कार्यालयांमध्ये 33 लाखांची रोकड सापडीलय. तर आतापर्यंत एकूण 3 कोटी 88 लाख जप्त करण्यात आलेत

सुपेच्या घरी कोट्यावधींचं घबाड

आतापर्यंत 3 कोटी 88 लाख जप्त केले आहेत यात पहिल्या धाडीत 88 लाख जप्त केले आहेत, दुसऱ्या धाडीत दोन कोटी रोकड आणि 70 लाखाचं 1.5 किलो सोनं जप्त केले आहे. तर तिसऱ्या धाडीत 33 लाख जप्त करण्यात आले आहेत. परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, बंगळुरूमधून जी.ए टेक्नॉलॉजीचा संचालक प्रीतेश देशमुखसह बीडमधून संजय सानप या मुख्यसूत्रधारांना अटक करण्यात आलीय. मात्र या प्रकरणाचे तार अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय. तसेच प्रकरणाच्या CBI चौकशीचीही मागणी केलीय.

पेपटफुटीमुळे विरोधकांनी सरकारला घेरले

एका बाजूला पेपर फुटीमुळे विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर दुसरीकडे पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आता आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात हे पाहावं लागेल. विरोधकांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला उत्तर देताना अजित पवारांनी, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी केली, त्याचं काय झालं? असा सवाल भाजपला विचारलाय. या चौकशीत आणखीही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्याता आहे. मात्र सध्या तरी यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे.

Video :’काय बाई सांगू? कसं गं सांगू? उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर हटके स्टाईल टीका

Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?

Triumph Street Twin EC1 भारतात लाँच, स्पेशल एडिशन मर्यादित काळासाठीच उपलब्ध

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.