कपडे-भांड्यांसाठी 5 हजार, नष्ट घरांसाठी दीड लाख, तौत्के वादळग्रस्त्रांना मदत जाहीर

तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.

कपडे-भांड्यांसाठी 5 हजार, नष्ट घरांसाठी दीड लाख, तौत्के वादळग्रस्त्रांना मदत जाहीर
तौत्के चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मदतीची घोषणा
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:45 PM

मुंबई : तौत्के चक्रीवादळानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला. यात अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसंच पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे. त्यामुळे तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आलीय. वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधुन करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचंही बैठकीनंतर सांगण्यात आलं. (Thackeray Government announces help for Tauktae cyclone victims)

नुकसान झालेल्या घरांसाठी किती मदत?

तौत्के चक्रीवादळामुळे ज्यांचं घर पूर्णत: उद्ध्वस्त झालं आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 1 लाख 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर त्यांच्या घरांचं अंशत: (किमान 15 टक्के) नुकसान झालं आहे अशा घरांसाठी 15 हजार रुपये, 25 टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी 25 हजार रुपये, तर किमान 50 टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी 50 हजार रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येईल. तसंच नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांना मदत रू. 15,000 प्रति झोपडी अशी मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरातील कपड्यांचे आणि भांड्यांचे नुकसान झालेल्या नागरिकांना 5 – 5 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

पिकांच्या नुकसानासाठी किती मदत?

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आलीय. त्यात प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी 50 हजार प्रति हेक्टर, नारळ झाडासाठी 250 रुपये प्रति झाड, सुपारी झाडासाठी 50 रुपये प्रति झाड अशी मदत दिली जाणार आहे.

दुकानदार व टपरीधारकारकांना नुकसान भरपाई

जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

मत्सव्यवसायिकांना नुकसान भरपाई

बोटींची अंशत: दुरूस्ती करण्यासाठी 10 हजार रुपये. पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 25, हजार रुपये. अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी 5 हजार रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी 5 हजार रुपये मदतची घोषणा करण्यात आलीय.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये

नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये इतकी मदत देण्यात येईल. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना दिनांक 26 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य आणि केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लाख रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लाख रुपयांची अशी एकूण 5 लाखाची मदत येईल. दरम्यान, आपत्ती प्रसंगी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली अनुदान/मदत घेतली असल्यास वरील मदत मिळणार नाही. तर पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर जलसंधारण आणि रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, मुख्यमंत्री निर्णय घेणार

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

Thackeray Government announces help for Tauktae cyclone victims

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.