AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !

सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषणने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे. (Thackeray Government Padma Awards )

ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !
| Updated on: Jan 26, 2021 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु ठाकरे सरकारने शिफारस केल्यानुसार केवळ एकाच व्यक्तिमत्त्वाचा ‘पद्म’ने सन्मान करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, कांगारुंना लोळवणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य राहणे, मसालाकिंग धनंजय दातार यासारख्या व्यक्तींची नावं राज्य सरकारने केंद्राला पाठवली होती. त्यापैकी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Thackeray Government recommended names for Padma Awards rejected by Modi Government)

ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सिरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवली होती. मात्र केंद्राने केवळ एकाच व्यक्तीची निवड केली असून इतर 97 जणांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे

विशेष म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषणने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे.

कोणाकोणाच्या नावांची शिफारस?

पद्मविभूषण

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख

पद्मभूषण

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला स्कायडायव्हर शीतल महाजन अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनेते मोहन आगाशे

पद्मश्री

लेखक मारुती चितमपल्ली बालमोहन विद्यामंदिरचे शिवराम (दादासाहेब) रेगे (मरणोत्तर) लेखक शं.ना. नवरे (मरणोत्तर) सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव गडाख मसालाकिंग धनंजय दातार कुस्तीपटू खाशाबा जाधव (मरणोत्तर) नेमबाज अंजली भागवत क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे क्रिकेटपटू स्मृती मानधना जलतरणपटू वीरधवल खाडे रंगभूमीकार अशोक हांडे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर अभिनेता हृतिक रोशन अभिनेता रणवीर सिंग अभिनेता जॉनी लिवर अभिनेता ऋषी कपूर (मरणोत्तर) अभिनेत्री राणी मुखर्जी अभिनेते विक्रम गोखले अभिनेते अशोक सराफ अभिनेते दिलीप प्रभावळकर अभिनेता सुबोध भावे अभिनेता मिलिंद गुणाजी अभिनेत्री मुक्ता बर्वे दिग्दर्शक नागराज मंजुळे संगीतकार अशोक पत्की संगीतकार अनिल मोहिले (मरणोत्तर) संगीतकार अजय-अतुल निवेदक सुधीर गाडगीळ खासदार संजय राऊत खासदार डॉ. अमोल कोल्हे डॉ. जगन्नाथ दीक्षित आहारतज्ज्ञ डॉ. ऋतुजा दिवेकर

संबंधित बातम्या :

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे मराठमोळे डीन श्रीकांत दातार यांचा ‘पद्मश्री’ने सन्मान

हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ

(Thackeray Government recommended names for Padma Awards rejected by Modi Government)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.