सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन ठाकरे सरकारने चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:14 PM

चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचा दावा सरकारने निर्णय घेताना केलाय. (Thackeray Government remove ban on Alcohol in Chandrapur after oppose of Social activist).

“दारूबंदीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही म्हणून दारुबंदी हटवण्याचा निर्णय”

विजय वडेट्टीवार म्हणाले, “दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता.”

“दारूबंदीवर नियंत्रण ठवणे शक्य झाले नाही. अनेक लोक डुप्लिकेट दारूच्या व्यवसायात गुंतले होते. लहान मुलं यात गुंतली होती. ड्रग्स विक्री होत होती. त्यामुळं बैठकीत दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. ही दारूबंदी देवतळे समितीच्या अहवालानुसार उठवली,” असं म्हणत काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दारुबंदी हटवण्याचं समर्थन केलंय.

“पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट”

या निर्णयावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविताना सरकारने अजब तर्क दिलाय. वर्धा-गडचिरोली जिल्ह्यातही हीच तस्करीची स्थिती आहे. शेतकरी वीज बिल माफ करा या मागणीऐवजी परमिट रूमवाल्यांना सूट द्या असे म्हणणाऱ्यांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने काँग्रेसला दारुबंदी हटवण्याचं गिफ्ट दिलंय.” या सरकारने कोरोना काळात दारुबंदी उठवून अमूल्य काम केल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

सरकारनं उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावं, पापाचा कर नको : डॉ. अभय बंग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारकडून कर उत्पन्न वाढवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याबाबत अनेक दिवसांपासून हालचाल सुरु होत्या. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या मार्गांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला होता (Dr Abhay Bang on Chandrapur Alcohol Ban). तसेच सरकारनं उत्पन्न वाढीसाठी पापाच्या कराचा आधार घेऊन हजारो कुटुंबं उद्ध्वस्त करु नयेत, असंही आवाहन केलं होतं.

“दारूबंदीनंतर 1 वर्षात 90 कोटी रुपयांची दारू कमी”

डॉ. अभय बंग म्हणाले होते, “एकीकडे कर्जमाफी, शिवभोजन अशी चांगली कामे केली जात आहेत. मात्र, दारुबंदी हटवून त्याच लोकांना दारू पाजली गेली, तर सरकारची चांगली कामही निरर्थक ठरतील. सरकारने चांगल्या मार्गाने उत्पन्न वाढवावे. दारूमुळे रस्ते अपघात होतात. सिरोसिस आणि कॅन्सरसारखे रोग होतात. त्यामुळे दारूपासून मिळणारा पापाचा कर कोणत्याही शासनाने वाढवू नये. दारूमुळे अवैध दारू वाढली हा शब्दच्छल आहे. कारण दारूबंदीनंतर सर्वच दारू अवैध ठरते. वस्तुतः बंदीमुळे दारू कमी होते.”

“चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू होण्यापूर्वी आम्ही जिल्ह्याचे नमूना सर्वेक्षण केले. त्यावेळी कायदेशीर, बेकायदेशीर अशी दोन्ही प्रकारे 192 कोटी रुपयांची दारू खपत होती. दारूबंदीनंतर 1 वर्षाने केलेल्या सर्वेक्षणात 90 कोटी रुपयांची दारू कमी झाली,” असंही डॉ. बंग यांनी नमूद केलं होतं.

“मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणार्‍या प्रमुख 7 कारणांमध्ये दारू”

जगभरात मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणार्‍या प्रमुख 7 कारणांमध्ये दारू हे एक कारण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. त्यामुळे सरकारने दारू कमी करण्याचा विचार करावा. दारू पाजून रोग, अपघात आणि बलात्कार वाढवू नये, असं आवाहनही डॉ. बंग यांनी महाराष्ट्र सरकारला केलं होतं.

चंद्रपूरमधली दारूबंदी इतिहास काय?

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर मागील 6 वर्षांत (फेब्रुवारी-2021 पर्यंत) तब्बल 118 कोटी 31 लाख 99 हजार 438 रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. 47 हजार 362 दारूतस्करांना अटक केली.

हेही वाचा :

चंद्रपुरात दारूबंदी उठवण्याच्या हालचाली, डॉ. अभय बंग यांचे मंत्रिमंडळाला 14 मुद्द्यांचे खरमरीत पत्र, वाचा…

‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनोखं अभियान

गडचिरोलीत ‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा हजार पार’, ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ पाहा :

Thackeray Government remove ban on Alcohol in Chandrapur after oppose of Social activist

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.