AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“किरीट सोमय्यांसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पाठवला ड्रेस”

Maharashtra Politics : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जोकरचा ड्रेस मातोश्रीवर पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओचा धागा पकडत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्यांसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पाठवला ड्रेस
Chitra Wagh-Kirit Somaiya
| Updated on: Sep 13, 2023 | 5:40 PM
Share

सागर सुरवसे, सोलापूर : ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आपल्या सभांमध्ये यांनी भाजपसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (BJP President Chandsrashekhar Bawankule) टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बावनकुळेंवर टीका करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूने तोंडावर लगाम लावावा असं म्हटलं होतं. यानंतर भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जोकरचा ड्रेस मातोश्रीवर पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना किरीट सोमय्यांसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे ड्रेस पाठवला आहे.

तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय त्यामुळे तुमच्या पक्षाचे आणि त्याची इज्जत जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना आम्ही ड्रेस पाठवून देत आहोत, असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच यावेळी बोलताना, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना थोडी तरी वाटायला पाहिजे. मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी तुम्ही बिनधास्त आपण एवढे बोलून उठून जायचं असं बोलताय. हे तीन तोंडी सरकार कुठल्याही समाजाला न्याय देणार नाही. जातीच्या नावावर केवळ मत मागतील वाऱ्यावर सोडतील, असं म्हणत शरद कोळी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचाच धागा पकडत शरद कोळी यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं. यावर आता चित्रा वाघ काही प्रत्युत्तर देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.