मी अजून 8 महिने…; निवडणुकांआधी मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं विधान

CM Eknath Shinde : महाराष्ट्रासह देशात यंदा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांचं एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं. या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? वाचा...

मी अजून 8 महिने...; निवडणुकांआधी मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 8:28 AM

अविनाश माने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 05 जानेवारी 2024 : निवडणुका काही महिन्यांवर आहेत. अशाच विविध घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश पार पडले. वरळी, पालघर, भिवंडी या भागातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण विधान केलं. मी अजून 8 महिने आहे. म्हणून आपल्याला फिरावं लागणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना पक्षात नव्याने दाखल झालेल्या लोकांचंही एकनाथ शिंदेंनी स्वागत केलं.

पक्षात दाखल झालेल्यांचं शिंदेंकडून स्वागत

आज दोन प्रवेश झाले आहेत वरळी आणि पालघर मधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. अतिशय कमी वेळात प्रवेश झाला. तुम्ही जो विश्वास दाखवला तो मी पूर्ण करेल. आम्ही राज्यात जो विकास केला. त्यामुळे विश्वासाने तुम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरचा विकास करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी काम करतो. मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी आपण वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघरपर्यंत रस्ता करणार आहोत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांचं स्वागत केलं.

सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी काम करत आहे. अडीच वर्षांत जर काम थांबले होते ते दीड वर्षात पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रात उद्योग नंबर एकवर करणार आहे. मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सरकार काम करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वात लोकप्रिय आहे. 2 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील विकास ठाणे सारखा झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे, असंही शिंदे म्हणाले.

“जेव्हा बंड केलं…”

जेव्हा बंड केलं तेव्हाचा प्रसंग एकनाथ शिंदे यांनी सांगितला. आम्ही बंड केलं. त्या दिवशी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण त्यांनी त्यावेळी म्हटले आधी लग्न कोंढाण्याचं आणि नंतर बाकीचं सगळं…, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.