ज्यांच्यामुळे मंदिरं राहिली त्याच छत्रपतींना…संयोगीताराजेंना वेदोक्तवरून झालेल्या विरोधावर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट, आव्हाड संतापले…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संयोगीताराजे छत्रपती यांच्या काळाराम मंदिरातील प्रसंगाच्या संदर्भात केलेल्या पोस्टवरून काळाराम मंदिरातील पूजाऱ्यासह सनातन धर्मावर हल्लाबोल केला आहे.

ज्यांच्यामुळे मंदिरं राहिली त्याच छत्रपतींना...संयोगीताराजेंना वेदोक्तवरून झालेल्या विरोधावर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट, आव्हाड संतापले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 1:17 PM

ठाणे : मागील महिण्यात संभाजीराजे छत्रपती यांचा नाशिकमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळेला संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील नाशिकमध्ये आल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या. यामध्ये त्या काळाराम मंदिरात देखील दर्शनासाठी गेल्या होत्या. त्याच वेळेला संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणत असतांना तेथील एका पूजाऱ्याने विरोध केला होता. त्यावर संयोगीता राजे यांनी ऐतिहासिक संदर्भ पूजाऱ्याला चांगलेच सुनावल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबबात ट्विट करून हल्लाबोल केला आहे. यावेळी आजही सनातनी असून त्यांचा छत्रपतींच्या वारसांना विरोध होतो तर बाकीच्यांचे काय असा सवालही उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी संयोगीताराजे छत्रपती यांनी केलेल्या पोस्टचा फोटो शेयर करत ट्विट करून हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा असे म्हणत सडकून टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये पुढे म्हंटलय, छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपतींमुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यांनी उत्तर दिले नाही. तुम्हाला अधिकार नाही

छत्रपतीं शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले, छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली, शाहू महाराजांना शुद्र म्हणाले. हेच सनातनी मनुवादी जही छत्रपतींना शुद्र समजतात. बर झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झाले.

जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा, आजच्या छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचे काय? बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो.

ह्याच काळाराम मंदिरात 2 मार्च 1930 रोजी मंदीर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. आजच्या सनातनी यांच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते. असे असतांनासनातनी धर्म परिषदेत फशारक्या मरतात असे ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

खरंतर रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराज छत्रपती यांनी एक पोस्ट शेयर केली होती. त्यावरून सोशल मिडियावर पूजाऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सनातन म्हणत पूजाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे याबाबत पुढील काळात काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.