Kalyan Crime : कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड, भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये कारवाई

तिघे आरोपी भांडत असताना एक्स्प्रेसमध्ये पेट्रोलिंगदरम्यान आरपीएफ जवानांचे त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड, भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये कारवाई
कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 4:56 PM

कल्याण : अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र चोरट्या मार्गाने गांजा, ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाची खरेदी विक्री सुरु असल्याचे आणखी एका घटनेमुळे समोर आले आहे. भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा (Ganja) कल्याण आरपीएफने जप्त (Siezed) केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे भांडत असताना एक्स्प्रेसमध्ये पेट्रोलिंगदरम्यान आरपीएफ जवानांचे त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्यांनी हा गांजा कोठून आणला आणि कोणाला त्याची विक्री केली जाणार होती याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसाकडून सुरु आहे. (55 kg ganja seized in Bhubaneswar Lokmanya Tilak Express in Kalyan, three smugglers arrested)

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे गांजा जप्त

कल्याण आरपीएफच्या जवानांच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधान व सतर्कतेमुळे एक्स्प्रेसमधून तब्बल 55 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तीन जण रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंहच्या मार्गदर्शनाखाली सी जी रुपदे यांचे पथक बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान वातानुकुलीत बी 3 बोगीतून प्रवास करणारे तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा करत असताना या तिघांमधील एकाने सीट खाली असलेली बॅग आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला.

पोलिस पाहताच तिघांच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन संशय बळावला

या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावरील संशय बळावला. यामुळेच आरपीएफच्या जवानांनी या तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली केले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे असलेल्या ट्रोली बॅगमध्ये सुमारे 5 लाख 53 हजार 950 रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी तात्काळ या तिघांना अटक करत गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. (55 kg ganja seized in Bhubaneswar Lokmanya Tilak Express in Kalyan, three smugglers arrested)

इतर बातम्या

Kalyan Police Suicide : कल्याणमधील निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या

Crime | औरंगाबादेत मोठी कारवाई, बिडकीनमध्ये 37 लाखांचा गुटख्याचा साठा पकडला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.