१०० वर्षांच्या तरुणाला उड्या मारताना पाहीलं का?, सत्कार समारंभात लगावले ठुमके
या कार्यक्रमात वयाची सेंच्युरी पूर्ण केलेले मधुसूदन गोखले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतरही आपला फिटनेस दाखवण्यासाठी स्टेजवरच रनिंग करून आणि उड्या मारून दाखवल्या.
निनाद करमरकर, प्रतिनिधी, ठाणे : अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचं किणीकर प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ नागरिक संघाकडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा ज्येष्ठ जोडप्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
१०० वर्षीय मधुसूदन गोखले यांचे फिटनेस
या कार्यक्रमात वयाची सेंच्युरी पूर्ण केलेले मधुसूदन गोखले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतरही आपला फिटनेस दाखवण्यासाठी स्टेजवरच रनिंग करून आणि उड्या मारून दाखवल्या. त्यांचा हा फिटनेस आणि उत्साह पाहून उपस्थितांसह जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर हेदेखील अचंबित झाले.
आनंदी जीवनाचे मूर्तीमंत उदाहरण
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. ते आपले मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली प्रगती होत असते. गोखले मामा यांनी या वयात कसं जगावं, आनंदी जीवन कसं जगावं याच मूर्तीमंत उदाहरण पाहायला मिळालं.
गोखले काका यांचा सत्कार
आमदार डॉ. बालाजी किणीकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम दरवर्षी असतो. ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. गोखले काका यांचाही सत्कार केला. १०० वर्षे होऊनही गोखले काका यांचा उत्साह वाखानण्याजोगा होता.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके, सुवर्णा साळुंखे, सुषमा भागवत, लीना सावंत, राहुल सोमेश्वर, संदीप तेलंगे, शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.