Ulhasnagar Fire : उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग, आगीत जीन्सचे रोल आणि मशिनरी जळून खाक

हा कारखाना अतिशय दाटीवाटीच्या लोकवस्तीत असल्यानं आग शेजारी पसरण्याची भीती होती. मात्र अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी मिळून ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं आहे.

Ulhasnagar Fire : उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग, आगीत जीन्सचे रोल आणि मशिनरी जळून खाक
उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 4:20 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात जीन्सच्या कारखान्या (Jeans Factory)ला आज मोठी आग (Fire) लागली. या आगीत कारखाना संपूर्णपणे जळून खाक झाला. उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागातील जय जनता कॉलनीत ओमप्रकाश प्रजापती यांचा जीन्स कारखाना आहे. या कारखान्यात जीन्स पॅन्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कापडाचे मोठमोठे रोल्स, मशिनरी आणि इतर साधन सामुग्री होती. या कारखान्याला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. (A huge fire at a jeans factory in Ulhasnagar, burning jeans rolls and burning machinery)

हा कारखाना अतिशय दाटीवाटीच्या लोकवस्तीत असल्यानं आग शेजारी पसरण्याची भीती होती. मात्र अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी मिळून ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं आहे.

इचलकरंजीत गोदामांना आग

इचलकरंजीत गुंज व स्क्रॅपच्या कारखान्यांना भीषण आग लागून यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर ओढ्यानजीक स्क्रॅपचे अनेक गोदामे आहेत. त्यामध्ये स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन आदी आहेत. या गोडाऊन पैकी एका वेस्टेज कापसाच्या गोडाऊनला शनिवारी रात्री 10 च्या सुारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत चार गोदामांना भक्ष्यस्थानी घेतले. अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.

पंढरपूरमध्ये उसाच्या फडाला आग

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे उसाच्या फडाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाळासाहेब म्हाडेकर आणि भिमराव म्हाडेकर यांच्या दहा एकर उसाला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. आगीत ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. (A huge fire at a jeans factory in Ulhasnagar, burning jeans rolls and burning machinery)

इतर बातम्या

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत वल्लभनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

खुनाच्या बदल्यात खुन ! विक्रमसिंह चौहान यांना गोळ्या घातल्या, शिवसेनेचे सुदेश चौधरी यांच्यासह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.